वेत्ये किनारी सापडली कासवाची ११३ अंडी

दुसऱ्यांदा सुवार्ता; ५५ दिवसांनी झेपावणार पिल्ले, ऑलिव्ह रिडलेचे दुसरे घरटे
olive ridley
olive ridleysakal

राजापूर : नव्या वर्षाच्या आरंभाला तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले(olive ridley) प्रजातीच्या कासवाची अंडी सापडलेली होती. याच ठिकाणच्या समुद्रकिनारी पुन्हा एकदा कासवाची ११३ अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकूळ जाधव यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्‍यावर घरटे करून योग्य पद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. वेत्ये किनाऱ्‍यावरचे यावर्षीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यांचे दुसरे घरटे झाले आहे.

olive ridley
पर्यटनस्थळे सरसकट बंद नकोत; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

तालुक्याच्या वेत्ये, आंबोळगड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची मादी अंडी घालण्यासाठी येत आहे. मात्र, यावर्षीचा अवकाळी पाऊस आणि बदललेले वातावरण यामुळे कासव उशिरा अंडी घालण्यासाठी येण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे यावर्षीच्या सुरूवातीला वेत्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी आढळली. त्यातून वेत्ये किनारी यावर्षीचे पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे झाले. त्यानंतर आंबोळगड समुद्रकिनारीही कासवाची अंडी आढळून आली. आज पुन्हा एकदा वेत्ये समुद्रकिनारी कासवाची अंडी आढळून आली. वेत्ये समुद्रकिनारी गेल्या कित्येक वर्षे कासवाच्या अंड्यांचे संवर्धन करण्यामध्ये कासवमित्र जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

olive ridley
सर्वोच्च न्यायालय राज्यांवर संतापले; कोरोना मृतांच्या भरपाईत विलंब

दिसले पावलांचे ठसे

आज ता. १९ रोजी पहाटेच्यावेळी समुद्रकिनारी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना त्यांना वाळूमध्ये कासवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या पावलांच्या ठशांच्या अनुषंगाने पाहणी करताना त्यांना कासवाची अंडी आढळून आली. त्यांनी तत्काळ राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली.

सुरक्षित ठिकाणी संवर्धन

किनाऱ्‍यावरील वन्यप्राणी वा जंगली श्‍वापदांपासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवले आहे. या अंड्यांमधून आता सुमारे ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर येणार असून या कासवाच्या पिल्लांचा समुद्रप्रवास पर्यटकांसह ग्रामस्थांना अनुभवता येणार आहे.

किनाऱ्‍यावरील वन्यप्राणी वा जंगली श्‍वापदांपासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवले आहे. या अंड्यांमधून आता सुमारे ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर येणार असून या कासवाच्या पिल्लांचा समुद्रप्रवास पर्यटकांसह ग्रामस्थांना अनुभवता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com