सहा वर्षांत ३२७ जणांचा मृत्यू 

सहा वर्षांत ३२७ जणांचा मृत्यू 

अलिबाग - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर तीन-साडेतीन तासांचे झाले; मात्र अतिवेग व मानवी चुकांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्र हद्दीत २०१६ मध्ये १३१ अपघात झाले. त्यामध्ये ५३ जणांचा मृत्यू ओढवला, तर ८५ जण जखमी झाले. सहा वर्षांत या महामार्गावर एक हजार २७८ अपघातांची नोंद झाली. यामध्ये ३२७ जणांचा मृत्यू, तर ५१२ जण जखमी झाले.

हा मार्ग रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि खालापूर या दोन तालुक्‍यांमधून जातो. तो अत्यंत धोकादायक बनला आहे. बहुसंख्य वाहनचालक अतिवेगाने वाहन चालवितात. पुढील वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. 

अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस व महामार्ग पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. महामार्गाभोवती फलक लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येते. वाहतूक पंधरवडा पाळण्यात येतो. बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येते. एवढे करूनही अपघात टळत नाहीत.

मुंबई-पुणे महामार्गही धोकादायक
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही परिस्थिती फारशी वेगळी नाही. या महामार्गावरही मागील वर्षभरात ९४ अपघात झाले. त्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू, तर ७० जण जखमी झाले. सहा वर्षांत ७९२ अपघातांत २१२ जणांचा मृत्यू, तर ३७० जण जखमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com