मालवणमध्ये आठ विद्यार्थी बुडाले; तिघांना वाचविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले.

मालवण : वायरी येथील समुद्रात आज (शनिवार) दुपारी 11 तरुण बुडाले. यातील तिघांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व तरुण बेळगावमधील आहेत. 

बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 विद्यार्थी सहलीसाठी मालवणला आले होते. त्यातील काही जण आज सकाळी पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा केला. 

या भागातील समुद्र धोकादायक आहे. 'खोल पाण्यात जाऊ नये' असे फलकही येथे लावले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष करून ही मुले पोहायला गेली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 

बुडालेल्या तरुणांना वाचविण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. त्यातील तिघांना वाचविण्यात त्यांना यश आले. या तिघांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. अन्य आठ जणांचा मात्र बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन तरुणी आणि पाच तरुणांचा समावेश आहे. 

मृतांची नावे:

 • मुजमीन अनिकेत
 • किरण खांडेकर 
 • आरती चव्हाण 
 • अवधूत 
 • नितीन मुत्नाडकर 
 • करुणा बेर्डे 
 • माया कोल्हे 
 • महेश

अत्यवस्थ

 • संकेत गाडवी
 • अनिता हानली
 • आकांक्षा घाडगे