एका पर्यटकाचा मृतदेह कावळेसादमध्ये सापडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

आंबोली - कावळेसाद पॉइंटजवळ दरीत कोसळलेल्या गडहिंग्लजमधील दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी दिसला, मात्र धुके आणि उशीर झाल्याने तो बुधवारी (ता.2) बाहेर काढण्यात येणार आहे. दुसऱ्याचा शोध उद्याच्या शोध मोहिमेत दरीच्या खालच्या बाजूने घेतला जाणार आहे.

प्रताप राठोड (वय 21, मूळ रा. बीड, सध्या अत्याळ-गडहिंग्लज) यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. इरफान गारदी (रा. हुंगीहाळ, ता. गडहिंग्लज) यांचा शोध मात्र लागला नाही.

गडहिंग्लजमधील सात जण काल आंबोलीत पर्यटनासाठी आले होते. यातील दोघे जण कावळेसाद पॉइंट येथून बेपत्ता झाले. सोबतच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना कळविले. मात्र, उशीर झाल्याने आज शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी साडेनऊपासून सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्या टीमने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली.