अधटराव यांना भाजपची कोसुंब गटामधून उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

देवरूख - जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर इतर पक्षात शांतता असताना सत्ताधारी शिवसेनेतील अंतर्गत घडमोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. नावडी गटाचे सदस्य राजेश मुकादम यांच्या राजीनाम्यानंतर आता कोसुंब गटातील इच्छुक उमेदवार आणि पंचायत समितीचे विद्यमान सभापती प्रमोद अधटराव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते कोसुंब गटातून भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. यामुळे कोसुंब गटातही सेनेला मोठा फटका बसणार आहे.

कोसुंब गटातून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले प्रमोद अधटराव सेनेचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरू होती. काल (ता. १) रात्री उशिरा त्यांनी आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्याकडे सादर केला. त्यांच्यासह पूर्वीच्या देवरूख जिल्हा परिषद गटातील त्यांच्या अनेक समर्थकांनीही राजीनामास्त्र उपसले आहे. आता माघार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याची संधी त्यांना देण्यात मिळाली. आज रात्री उशिरा किंवा उद्या त्यांची उमेदवारी जाहीर होईल.

कोसुंब गटातील निवे गणात अधटराव यांचे वजन आहे. याच गणातून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसतानाही आदर्श प्रयोगशील शेतकरी, सरपंच, पंचायत समिती सदस्य ते उपसभापती अशी त्यांची कारकिर्द घडली आहे. निवे गणात त्यांना चांगले समर्थक आहेत. कोसुंब गणातूनही ते तगडी लढत देऊ शकतात. या गटात राष्ट्रवादीकडून सौ. नेहा माने, तर शिवसेनेकडून रोहन बने रिंगणात आहेत. अधटराव यांच्या भाजपकडील उमेदवारीने आता सेना आणि राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ
गेल्या दोन दिवसांत सेनेने तालुक्‍यातील दुसरा मोहरा गमावला आहे. यामुळे सेनेतील अंतर्गत गटबाजी आता उफाळून आली आहे. अधटराव यांच्या समर्थनार्थ निवे गणातून त्यांचे समर्थक उद्यापासून राजीनामासत्र सुरू करणार आहेत. परिणामी हक्‍काचे सैनिक थांबवताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे.

कोकण

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य कणकवली / सावंतवाडी -...

07.24 AM

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद...

05.51 AM

राजापूर - तालुक्‍यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आंबा कलमांची लागवड...

05.39 AM