आडिवरे-नाते रस्त्यावरील पूल खचला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

आडिवरे - आडिवरे पंचक्रोशीमध्ये शुक्रवारी (ता. 23) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आडिवरे-राजवाडीमार्गे नाते रस्त्यावरील कांगापूर येथील पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे राजवाडी, तिवरे भागातील विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. आडिवरे -वाडापेठमधील महाकाली मंदिराच्यानजीकच्या नदीचे पाणी सागरी मार्गावर सुमारे तीन फूट भरले होते.

येथील रस्त्यालगतच्या सर्व दुकान व एसटी कॅंटिनमध्ये पाणी घुसले. त्यामुळे सामानाचे नुकसान झाले. सकाळी रस्त्यावर चिखल आणि माती सर्वत्र दिसून येत होती. आडिवरे-राजवाडी मार्गे नाते या रस्त्यावर असणाऱ्या कांगापूर येथील पूल खचला. यापूर्वी पावसाळ्याच्या सुरवातीला पुलाचा काही भाग वाहून गेला होता. तरीही वाहतूक सुरू होती. आता पुलावरील काही भाग वाहून गेल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने जीवितहानी झाली नाही. पहिल्यांदा पूल खचला तेव्हा तात्पुरती दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने केली होती. हे दुरुस्तीचे केलेले कामही पावसाने वाहून गेले. आज दुपारपर्यंत कोणाही अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने घटनास्थळाची पाहणी केलेली नव्हती.

कोकण

कणकवली - राज्य शासनाने पवित्र (Portal for Visible to all Teacher Recruitment)  या संगणक प्रणालीद्वारे राज्यातील सर्व...

12.42 PM

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार...

12.42 PM

रत्नागिरी - हमारी युनियन हमारी ताकद.. हम सब एक है.. असा नारा देत ईपीएस (१९९५) कर्मचाऱ्यांच्या गेली २१ वर्षे होत असलेल्या...

12.36 PM