नदीत पडून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

अलिबाग - श्रीवर्धन तालुक्‍यातील निगडीकाठी नदीवरील पुलावरून पाण्यात पडून पांडुरंग शांताराम करंदेकर (वय 65) यांचा शनिवारी (ता. 3) रात्री मृत्यू झाला.

अलिबाग - श्रीवर्धन तालुक्‍यातील निगडीकाठी नदीवरील पुलावरून पाण्यात पडून पांडुरंग शांताराम करंदेकर (वय 65) यांचा शनिवारी (ता. 3) रात्री मृत्यू झाला.

करंदेकर हे आडी गावचे रहिवासी असून, कामावरून परत येत असताना ते पुरातील पाण्यात पडले. नदीला पाणी जास्त असल्याने त्यांचा शनिवारी शोध लागला नव्हता. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. करंदेकर हे पाय घसरून पडल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.