किनळोसमध्ये शेततळीमुळे पर्यायी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

कडावल - ‘मागेल त्याला शेत तळे’ योजनेंतर्गत किनळोस गावात दोन शेततळी बांधून पूर्ण झाली आहेत. याचा वापर प्रामुख्याने उन्हाळी शेतीसाठी होणार असल्याने पाणीटंचाईची झळ काही प्रमाणात कमी होणार आहे. गावातील इतरही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. यामुळे येत्या काळात येथे शेततळ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी स्थिती आहे.

विविध कारणांमुळे भू-गर्भातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने कृषी, उद्योग तसेच इतरही सर्व क्षेत्रांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी व्यवसायाला तर पाणीटंचाईची झळ अधिकच तीव्रतेने बसत आहे. शेतीला योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शिवारात शेततळे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.

या योजनेअंतर्गत किनळोस गावात दोन शेततळी बांधली आहेत. यापैकी एक शेततळे चोरग्याचा पाचा येथे बबन सावंत व संजय सावंत या बंधूनी बांधले आहे, तर दुसरे शेततळे साटमाची गाळी येथे कैलास साटम यानी बांधले आहे. या दोन्ही शेततळ्यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळी िपकांच्या सिंचनासाठी करण्यात येणार आहे. यामुळे पाणीटंचाईची झळ काही अंशी कमी होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास गावातील इतरही अनेक शेतकरी इच्छुक असून येत्या काळात येथे शेततळ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता  व्यक्त होत आहे.