अंबरिनच्या विवाहाला कोकणवासीयांची मांदियाळी

दुबई - भारतीय उद्योगपती बशीरभाई हजवानी यांची कन्या अंबरिन हिच्या विवाह समारंभाच्या स्वागत समारंभात पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या. सोबत बशीरभाई हजवानी, रियाज कालसेकर, अरुण कदम, योगेश कदम, सिद्धेश कदम, वाय. सी. पवार आणि मान्यवर.
दुबई - भारतीय उद्योगपती बशीरभाई हजवानी यांची कन्या अंबरिन हिच्या विवाह समारंभाच्या स्वागत समारंभात पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या. सोबत बशीरभाई हजवानी, रियाज कालसेकर, अरुण कदम, योगेश कदम, सिद्धेश कदम, वाय. सी. पवार आणि मान्यवर.

खेड - दुबई येथील भारतीय उद्योगपती आणि खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांची कन्या अंबरीन हिचा विवाह नुकताच दुबईतील बडे व्यावसायिक रियाज कालसेकर यांचा पुत्र खालिद यांच्याशी मोठ्या थाटात झाला. कालसेकर कुटुंब मूळचे रायगडातील आहे. दुबईतील प्रसिद्ध जुमेरा बीच हॉटेल आणि बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये झालेल्या समारंभाला भारतासह, दक्षिण आफ्रिका, मध्य-पूर्व कुवेत, कतार, बहरीन, सौदी अरेबिया, इंग्लंड, पाकिस्तान आदी देशांतील अनेक मान्यवर हजर होते.

कोकणातून दुबईत जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात यशस्वी झाल्यानंतर दुबईत आपल्या मुलीच्या लग्नाला भारतातून आपल्या नातेवाईक आणि स्नेह्यांना आणि मित्रपरिवारला बोलावून त्यांचे केलेले आदरातिथ्य हे या विवाहाचे वैशिष्ट्य ठरले. 

स्वागत समारंभाला राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम व त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, खेड पंचायत समिती सभापती अरुण कदम, मुंबईचे आमदार आरिफ नसिम खान, माजी पोलिस उपमहासंचालक वाय. सी. पवार, इंग्लंडमधील लिसेस्टरचे माजी आमदार फारुक सुबेदार, दुबईचे व्यावसायिक महमंद खालिद अल अली, दक्षिण आफ्रकेतील डॉ. रिधवान, मुंबईचे 
सुप्रसिद्ध डॉ. नजीर जुवले, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. खलील मुकादम, डॉ. उंडरे, शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख, नवी मंबईचे माजी उपमहापौर इक्‍बाल कवारे, डॉ. झहीर काझी, पत्रकार फिरोजा तसवी, फिदा तसबी, उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष खुर्शीद सिद्दिकी, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सिकिंदर जसनाईक, अल मदिना वेल्फेअर संस्थेचे उपाध्यक्ष मन्सूर मुकादम आदी मंडळींनी हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com