आंबोलीत रविवारी ‘थंडा’ प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

आंबोली - आवश्‍यक तेवढा पाऊस न झाल्याने आंबोलीतील धबधबे पूर्ण क्षमतेने अद्याप वाहण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आज वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी थंडा प्रतिसाद मिळाला. 

या वेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता; परंतु गर्दीच नसल्यामुळे आजच्या पर्यटनाचा पहिला रविवार सुरळीत गेला. पुढच्या रविवारी सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे मोठी गर्दी होणार आहे. असा दावा पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी केला आहे.

आंबोली वर्षा पर्यटनाला आजपासून सुरुवात झाली. रविवार असल्याने मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित न झाल्याने म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. या वर्षी पहिल्याच रविवारी जास्त गर्दी नव्हती. पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पाऊस नसल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. अजून धबधबे म्हणावे तसे प्रवाहित नाहीत. त्यामुळे मुख्य धबधब्याकडेच पर्यटक होते. हॉटेल देखील हाऊसफुल झालेली नव्हती. पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, वाहतूक पोलिस नितीन उमरजकर, प्रवीण ओरोस्कर, उपनिरीक्षक मुल्ला, सहायक निरीक्षक अरुण जाधव यांनी वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने केले. गर्दी नसल्याने अवजड वाहने सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मात्र कुठेही वाहतूक विस्कळित झाली नाही. कावळेसाद, महादेवगड हिरण्यकेशी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी पेट्रोलिंग ही ठेवले होते. धबधब्याजवळ वनखात्याने कर्मचारी ठेवले होते. तेथे वनविभागाने कर वसुली सुरू केली आहे.

पर्यटन व्यावसायिक मोठी अपेक्षा करून होते; मात्र अपेक्षेप्रमाणे पर्यटक आले नाही. आज पाऊस आणि धबधबेही जोरात वाहत नव्हते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी व पर्यटकांचा खोळंबा झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येत्या रविवारी जास्त गर्दी होण्याची शक्‍यता आहे.