जम्मूत झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुजाला 3 सुवर्णपदके 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

वेंगुर्ले - नॅशनल अनइक्विप्ट, क्‍लासिक पुरुष, महिला पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलिफ्ट चॅम्पियनशिप 2017 या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या अनुजा तेंडोलकर यांनी 3 सुवर्णपदके पटकाविली. ही स्पर्धा जम्मू येथे 21 ते 24 मार्च कालावधीत झाली. 

स्पर्धेचे उद्‌घाटन जम्म-क्‍किाश्‍मिरचे बांधकाममंत्री सुल्फिकार अली यांच्या हस्ते झाले. राज्य सेक्रेटरी संजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचा 14 स्पर्धकांचा संघ सहभागी झाला होता. स्पर्धेत सिंधुदुर्गच्या अनुजा तेंडोलकर यांनी 50 ते 60 वयोगटातून 84 पेक्षा जास्त किलो वजनी गटातून पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस व डेडलिफ्ट या प्रकारात 3 सुवर्णपदके पटकाविली. या महाराष्ट्राच्या संघासमवेत संघ व्यवस्थापक उत्तम धुरी व प्रशिक्षक राजेश गायकवाड उपस्थित होते. 

तेंडोलकर यांच्या या यशाबद्दल जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कराज कोले, नगराध्यक्ष राजन गिरप, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू बेग, सचिव दिलीप नार्वेकर, खजिनदार डॉ. गणेश मर्गज, राज्य अध्यक्ष मधुकर दरेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Anuja 3 gold medals