शिवराजेश्‍वर मंदिर दुरुस्तीस पुरातत्त्वची परवानगी

शिवराजेश्‍वर मंदिर दुरुस्तीस पुरातत्त्वची परवानगी

मालवण - येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्‍वर मंदिराच्या दुरुस्तीस अखेर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखालीच दुरुस्तीचे काम होणार आहे. पुरातन वास्तूत कोणताही बदल होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पुरातत्त्वचे अधिकारी राजेश दिवेकर यांच्यासोबत १६ ला मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीस सार्वजनिक बांधकामचे अधिकारीही सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली. 

शासकीय विश्रामगृह येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील नाईक यांची सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांच्यासमवेत बैठक झाली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष राणे, बाबा सावंत, बांधकामचे उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन दाणे, प्रदीप पाटील, प्रकल्प व्यवस्थापक सुमित शर्मा, कोळंबचे संदीप भोजने, विजय नेमळेकर, विजय ढोलम, सन्मेश परब आदी उपस्थित होते.

अंतिम निर्णय लवकरच
पुरातत्त्व विभागाने केलेल्या सूचनांनुसार दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी पुरातन मंदिरांची दुरुस्ती केलेल्या ठेकेदारांना बोलाविले आहे किंवा जे माहीतगार ठेकेदार आहेत त्यांच्याकडून बांधकाम विभाग काम करून घेईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com