एटीएम भरणा पैशांमध्ये सव्वा कोटींचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

चिपळूण - "एटीएम' केंद्रामध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशांपैकी सव्वा कोटींचा अपहार केल्याचे शुक्रवारी येथे उघड झाले. या प्रकरणी कोल्हापूर येथील सिक्‍युरिटी इंडिया प्रा. लि. कंपनीने पोलिस ठाण्यात चौघांविरोधात अपहाराची फिर्याद दिली आहे. हा अपहार गेल्यावर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत घडलेला आहे. 

चिपळूण पोलिसांनी सांगितले, की फिर्यादीनसुार पोफळी येथील सुनील सुभाष मोरे, कान्हे येथील नीलेश मनोहर पवार आणि धामणवणे येथील नीलेश नंदकुमार लाड यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2016 या दरम्यान खेड, चिपळूण, संगमेश्‍वर तालुक्‍यातील "एटीएम'मध्ये पैसे भरण्यासाठी विविध बॅंकांकडून तब्बल 1 कोटी 26 लाख 96 हजार रुपये घेतले. ते न भरता परस्पर वापरले. खोटे दस्तऐवज तयार करून संबंधित कंपनी आणि बॅंकांची फसवणूक केली.