विषम हवामानामुळे फळांच्या राजाला ताप

विषम हवामानामुळे फळांच्या राजाला ताप
विषम हवामानामुळे फळांच्या राजाला ताप

दापोली - या वर्षी थंडीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. दापोलीचा पारा 11 नोव्हेंबरला 11.2 इतका खाली घसरला होता. गेल्या दोन वर्षांत प्रथमच इतक्‍या कमी तापमानाची नोंद झाली आहे; पण त्याचवेळी कमाल तापमानही अधिक आहे. ते 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. याचा फटका सुप्रसिद्ध हापूसच्या फलधारणेवर होण्याची शक्‍यता आहे. या वर्षी पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. थंडीमुळे फुले भरपूर आली असली, तरी ती सेट होऊन फलधारणा होण्यावर विषम हवामानामुळे परिणाम होत आहे.

कोकणातले मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या दापोलीत या वर्षी ऑक्‍टोबर हीट फारच कमी जाणवली. या वर्षी गुलाबी थंडीने वातावरण आल्हाददायक राहिले. गेल्या महिन्याच्या आरंभी दापोलीचा पारा 20 सेल्सियसपर्यंत खाली आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाच्या सरासरीत पारा 6.7 सेल्सियसने उतरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सात दिवसांत सरासरी तापमान 15.7 इतके नोंदले गेले, तर याच कालावधीत गेल्यावर्षी ते 22.5 सेल्सियस होते.

गत वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय फरक जाणवला. एकीकडे पहाटे आणि सायंकाळी तापमान सरासरी 18 सेल्सियस होते; मात्र दिवसभर वातावरणात उष्णता व कमाल तापमान 34.3 सेल्सियस इतके नोंदविले गेले. किमान आणि कमाल तापमानात जवळपास 16 सेल्सियस एवढा फरक होता. या वर्षी नोव्हेंबरमधील दुसऱ्या पंधरवड्यात तापमान गेल्या दोन वर्षांपेक्षा सर्वात कमी आहे. गतवर्षीपेक्षा (19.3 सेल्सिअस) या वर्षी ते 14.2 सेल्सियस एवढे कमी आहे.

दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषी हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात नोंदविलेल्या 2014 आणि 2015 च्या तापमानाच्या आकडेवारीनुसार या वर्षी दापोली थंड आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत (19.3 सेल्सिअस) या वर्षी तापमानात 5.2 सेल्सिअस घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com