रत्नागिरी : पावसानंतर ढगाळ वातावरणाची संक्रांत

बदलते हवामान हापूसला बाधक; मोहोरावर कीड पडण्याचा धोका, कैऱ्या डागाळल्याने नुकसान
mango
mangosakal
Summary

बदलते हवामान हापूसला बाधक; मोहोरावर कीड पडण्याचा धोका, कैऱ्या डागाळल्याने नुकसान

रत्नागिरी : थंडीमुळे तिसऱ्या टप्प्यात हापूसच्या बहुसंख्य झाडांना मोहोर आला आहे. झाडेच्या झाडे पानांपेक्षा मोहोरांनी झाकून गेली आहेत; मात्र सोमवारीही (ता.१७) दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने मोहोरावर किडींच्या प्रादुर्भावाची भिती आंबा बागायतदारांमध्ये आहे. पावसापाठोपाठ ढगाळ वातावरणाची संक्रांत हापूसवर आली आहे.

mango
सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; राजाच्या दर्शनासाठी प्रजेची व्याकुळता

मागील आठ दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, कडकडीत थंडी आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती वारंवार पाहायला मिळत आहे. मोहोर आणि कणी सेटींगच्या कालावधीत हापूसच्या कलमांना स्वच्छ वातावरण अपेक्षित असते. तसे झाले तर हंगामात चांगले उत्पादन मिळते; मात्र यंदा स्वच्छ वातावरणाचे दिवस कमी झाल्याचे चित्र वारंवार अनुभवयला मिळत आहे. तापमान नऊ अंशापर्यंत घसरल्यामुळे पौष महिन्यात अनेक हापूसच्या कलमांना मोहोर आला आहे. झाडांच्या ९९ टक्के टाळ्यांना मोहोर फुटल्यामुळे पाने कमी मोहोर अधिक अशी स्थिती बहुसंख्य बागांमध्ये दिसत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला चांगली फूट झाली होती. बागायतदारांनी ऑक्टोबर महिन्यात फवारणी केल्यामुळे कणी सेटींगही चांगले होत होते पण बदलत्या वातावरणाने कणी गळून गेली.

mango
रत्नागिरी : वाचनकोपरा ते फिरता वाचनकट्टा तोही दुर्गम भागात

फांदीला एखाद-दुसरी कैरी लगडलेली दिसत आहे. त्यानंतर जानवोरीच्या पहिल्या आठवड्यापासून पडलेल्या थंडीमुळे देठापासून मोहोर फुलले होते. पौष महिन्यात आलेल्या मोहोरला कणी सेटींग कमी होते. सध्याच्या स्थिती काय होते यावर बागायतदार लक्ष ठेवून आहेत; मात्र निसर्गाकडून साथ मिळत नाही. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास सूर्यप्रकाश येऊ लागला पण तोही अर्ध्या तासात गायब झाला. हलका वाराही वाहत होता. हे वातावरण आंबा पिकाला (mango crop)घातक असल्याचे बागायतदारांचे मत आहे. सकाळच्या सत्रात थंडीमुळे मोहोरावर दव पडतो. दिवसभर कडकडीत ऊन नसेल तर त्यात बुरशी पडण्याची शक्यता आहे. यावर बुरशीनाशकांची फवारणी अत्यावश्यक आहे

mango
रत्नागिरी : अंधेरनगरी चौपट राजासारखे सरकार

सतत हवामानात(changes in weather) बदल होत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत झाडांचे निरीक्षण करत राहावे लागणार आहे. ढगाळ वातावरणामुळे डागाळलेली कैरी पाडून टाकावी लागेल. तसे न केल्यास आजूबाजूच्या कैऱ्यांवर(weather effect on mango) त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

- देवेंद्र झापडेकर,

आंबा बागातयदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com