''भाजपला कुठल्याच नेत्याची गरज नाही''

Meeting of BJP leaders
Meeting of BJP leaders

कणकवली : जेथे कॉंग्रेसचे सरकार होते, तेथील जनतेने उठाव करून भाजपला मतदान केले आहे. तर जेथे भाजपची सत्ता होती तेथील सत्ता आणखी मजबूत झाली आहे. सिंधुदुर्गातील राजकीय परिस्थिती देखील बदलत आहे. त्यामुळे भाजपला नेत्यांची गरज नाही,' असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी आज येथे केले.

पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंडित दीनदयाळ विस्तारक योजनेबाबतची माहिती दिली. 

यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता, भाजपला सध्या कुठल्याच नेत्यांची गरज नाही अशी टीका केली. यावेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रज्ञा ढवण, रवींद्र शेट्ये, बबलू सावंत आदी उपस्थित होते. 

पारकर म्हणाले, कॉंग्रेसच्या कारभाराला जनता प्रचंड कंटाळली होती. जनतेला नरेंद्र मोंदीच्या रूपाने नवा नेता मिळाला. लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारची कामगिरी दिवसेंदिवस प्रभावी होत आहे. त्यामुळे पुढील काळात देशभरात शतप्रतिशत भाजप असणार आहे. त्यामुळे भाजपला सध्या कुठल्याच नेत्यांची आवश्‍यकता उरलेली नाही. 

ते म्हणाले,''जिल्ह्यात पुढील काळात सर्व सत्तास्थाने भाजपकडे असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालातून हेच चित्र स्पष्ट झाले. कणकवली तालुक्‍यात मात्र भाजपला अद्याप यश मिळालेले नाही. पंडित दीनदयाळ योजनेच्या माध्यमातून आम्ही केंद्र, राज्य शासनाच्या योजना समाजातील अगदी शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचविणार आहोत. भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचा पदाधिकारी जनतेपर्यंत पोचणार आहे.'' 

पाणी टंचाई दूर होणार : राजन तेली 
जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुढील काळात ओहोळ ते नदीपात्राच्या उगमापर्यंत बंधारे बांधले जाणार आहेत. नदी पात्रातील राज्य, राष्ट्रीय महामार्गाच्या पुलालगत ही पाणी साठवणूक बंधाऱ्यांची उभारणी होणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही अशी माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली. 

अशी आहे योजना... 
पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने पंधरा दिवस विस्तारक म्हणून परगावी जायचे आहे. या सर्वांनी बूथवरील कार्यकर्त्यांच्या रोज सकाळी गाठी-भेटी घेणे, घरोघरी संपर्क साधणे. केंद्र-राज्याच्या अन्य योजनांची माहिती देणे. संस्था, मंडळ, शाळा, सहकारी संस्थांची माहिती गोळा करणे. रोज सायंकाळी सभा (कॉर्नर सभा) घेणे. कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांशी अनौपचारिक गप्पा मारणे आदींचा समावेश आहे. खासदार, आमदार, महापालिका, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य अशा सर्वांसाठीच ही योजना सक्तीने राबविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com