ग्रामपंचायतीसाठी भाजपकडून शक्कल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

सावंतवाडी - आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याची अनोखी शक्कल लढविण्यात आली आहे. 

त्या माध्यमातून वर्षाकाठी सहा वेगवेगळे कार्यक्रम घेण्याच्या सूचना जिल्हास्तरावरून देण्यात आल्या आहेत. हे कार्यक्रम यशस्वी झाल्यास त्याचा निश्‍चितच फायदा पक्षवाढीसाठी होणार आहे, असा विश्‍वास पक्षाच्या वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात भाजपाला जिल्ह्यात राज्यात चांगले यश मिळाले आहे. आता येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत हा यशाचा आकडा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध कार्यक्रम राबवून तळागाळातील लोकांपर्यत पोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहण्याची शपथ घेण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपा संघटना मजबूत होण्यास मदत होणार आहे. दिवाळी ते नाताळ या कालावधीत बूथवरील कार्यकर्ते एकत्र येऊन मेळावा घेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, गायन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू, तिळगूळ वाटप आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात महराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती उत्सव प्रत्येक बूथवर साजरा करण्यात येणार आहे. तसेच शिवपुतळा किंवा प्रतिमापूजन करून शिव प्रतिमांचे वाटप करण्यात येणार आहे.  या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचतील असा विश्‍वास भाजपच्या वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला आहे.’’

५ जूनला पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक बूथवर शंभर झाडे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी सर्व ठिकाणी काजूची झाडे लावण्यात येणार आहे. आणि विषेश म्हणजे प्रत्येक झाडास संबधित कार्यकर्त्याचे नाव देण्यात येणार आहे. ७ ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रम ‘अटल बंधन’ या नावाने साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक बूथवर भाजपच्या झेंड्याची राखी कार्यकर्त्यांना बांधण्यात येणार आहे.
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष, भाजप