धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सावर्डे - कोकण रेल्वे मार्गावरील मंगल एक्‍स्प्रेसमध्ये २५ जानेवारीला एका महिलेने बाळाला जन्म दिला. आई व वडिलांनी मंगला एक्‍स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म झाल्याने तिचे नाव ‘मंगला’ ठेवण्याचा निर्णय घेतला. 

सावर्डे - कोकण रेल्वे मार्गावरील मंगल एक्‍स्प्रेसमध्ये २५ जानेवारीला एका महिलेने बाळाला जन्म दिला. आई व वडिलांनी मंगला एक्‍स्प्रेसमध्ये बाळाचा जन्म झाल्याने तिचे नाव ‘मंगला’ ठेवण्याचा निर्णय घेतला. 

मंगला एक्‍स्प्रेसमधून रवींद्रकुमार विश्‍वकर्मा व पत्नी ज्योती उत्तर प्रदेश येथे बहिणीच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने जात होते. पत्नीला नऊ महिने पूर्ण झाले होते. ज्योती यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. डब्यातील नागरिकांच्या प्रसंग लक्षात आला. त्या डब्यातील महिला एकवटल्या. त्याच डब्यात दोघी नर्स होत्या. त्यामुळे ज्योती यांची प्रसूती व्यवस्थित झाली. मात्र ज्योतीला तातडीने दवाखान्यात नेणे गरजेचे होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी  सावर्डे व चिपळूण रेल्वेस्थानकावर या घटनेची माहिती दिली. रेल्वे सावर्डेत थांबवण्यात आली. तातडीने ज्योतीला डेरवण रुग्णालयात हलवले. विश्र्‍वकर्मा दांपत्‍याकडे पुरेसे पैसे नसल्‍याने प्रवाशांनी  त्‍यांना मदत केली. ज्योती आणि बाळ सुखरूप असल्याने विश्‍वकर्मा दांपत्य आनंदी आहे.

कोकण

सावंतवाडी - नारायण राणेंचा भाजप प्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे; मात्र...

03.48 AM

सावंतवाडी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी सोशल मिडीयावरून पसरविण्यात येणाऱ्या अंबोली घाटाबद्दलच्या अफवा...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017