चौथ्या मजल्यावरून पडून मुलगा सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

खोपोली - येथील आशियाना इस्टेटमधील भानुप्रभा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीत खेळताना हर्षद सलीम चव्हाण हा आठ वर्षांचा मुलगा थेट खाली कोसळला. जमिनीवर ठेवलेल्या लोखंडी खाटेवर पडल्याने किरकोळ दुखापतींवर निभावून त्याचा जीव वाचला.

त्याच्या डोके व पायाला किरकोळ इजा झाली आहे. खोपोलीतील सहायक पोलिस निरीक्षक सलीम चव्हाण यांचा तो मुलगा आहे. शनिवारी संध्याकाळी गच्चीवर खेळत असताना हर्षदचा तोल गेला. तो खाली पडताच इमारतीमधील विनोद मोरे, सचिन मोरे व वीणानगर रहिवासी संघाचे सदस्य मदतीला धावले. सचिन मोरे यांच्या वाहनातून त्याला आधी खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्‍टर नसल्याने मग नगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार व सीटी स्कॅन करण्यात आले.

डोक्‍याला मार लागला नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला जाखोटिया रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेची माहिती समजताच सलीम चव्हाण यांच्यासह खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एम. देशमुख आदींनी तिकडे धाव घेतली. अधिक उपचारांसाठी हर्षदला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.