बसपा जिल्ह्यात स्वबळावर लढणार - दीपक जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

दोडामार्ग - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जिल्हा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार आहे. जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी माहिती  दिली.      

बहुजन समाज पार्टी अध्यक्षा मायावती व प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांच्या आदेशान्वये बहुजन समाज पार्टी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. 

बसपा फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा व निवडणूक आयोगाची मान्यता असलेला पक्ष आहे. एक नेता एक पक्ष व एक निशाणी असलेला राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष आहे. पक्ष उत्तरप्रदेशप्रमाणे महराष्ट्रातही बळकट होत आहे. ज्याप्रमाणे बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेश मध्ये वाढत गेली काँग्रेस पक्ष नेस्तानाबूत झाला. महाराष्ट्रातही काँग्रेस राष्ट्रवादीची तशी स्थिती आहे. यापूर्वी बहुजन समाजाला पर्याय नसल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीकडे मत टाकले जात होते; मात्र आता बहुजन समाज पक्ष हा बहुजनांचा पक्ष असल्याने प्रस्थापित पक्षांकडे बहुजन समाज आपले मतदान टाकणार नाही. ही प्रक्रिया आता जलदगतीने वाढत असून येणाऱ्या काळात भाजप, शिवसेनेला देखील महाराष्ट्रात मागे टाकणार आहे. महाराष्ट्रात सर्वच प्रस्थपित पक्षा मध्ये बहुजन समाजाला दुय्यम वागणूक दिली जात  असून फक्त मतांच्या जोगव्यासाठी त्यांचा वापर केला जात  आहे व या वर्गाच्या मूलभूत समस्या सोडवण्यामध्ये सर्वच सत्ताधारी पक्ष अयशस्वी झालेले दिसत आहे. त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या लोकांनी नवीन नवीन प्रयोग करण्यापेक्षा बहुजन समाज पार्टी मध्ये सामील व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले. 

इच्‍छुकांना संपर्क साधण्‍याचे आवाहान 
दरम्‍यान, इच्छुक उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव दीपक जाधव यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन त्यांनी करण्‍यात आले आहे.