मालवण किनारी बंपर सुरमई

मालवण किनारी बंपर सुरमई

मालवण - येथील किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छीमारांना आज सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाली. सुरमईची आवक वाढल्याने 900 रुपये किलोवरून 400 रुपये किलो अशी दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र मुंबईकर चाकरमानी, मत्स्यखवय्यांची यामुळे चंगळ झाली आहे. किमती मासळीच्या दरात घसरण झाल्याने थाळ्यांचे दरही कमी झाले आहेत.

गेले काही दिवस रापणकर मच्छीमारांसह अन्य मच्छीमारांना येथील समुद्रात मासळीची चांगली कॅच मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आज स्थानिक मच्छीमारांना सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाल्याचे दिसून आले. काल सुरमईचा दर 900 रुपये किलो एवढा होता. मात्र आज आवक वाढल्याने तिचा दर 400 रुपये किलो असा घसरला होता. पापलेट 550 रुपये किलो, बांगडा 550 रुपये, म्हाकुल 200 रुपये, मोरी 400 रुपये, कोळंबी 550 रुपये किलो दराने उपलब्ध होती.

सध्या गणेशोत्सव असला तरी येथे दाखल झालेल्या मुंबईकर चाकरमानी तसेच पर्यटकांकडून या मासळीला चांगली मागणी आहे. शिवाय दरात घसरण झाल्याने मत्स्य खवय्यांची चांगलीच चंगळ झाल्याचे दिसून येत आहे. किमती मासळीच्या दरात घसरण झाल्याने थाळ्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे या मासळीवर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com