उन्नाव व कठूआ बलात्कार घटनेच्या निषेधार्थ पालीत कँडल मार्च

अमित गवळे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

अनेकांनी हातात मेणबत्त्या, निषेध व प्रबोधनात्मक संदेश असलेले फलक घेतले होते. येथील शिवाजी स्मारकाजवळ या कँडल मार्चची सांगता झाली.

पाली (जि. रायगड) - उन्नाव व कठूआ बलात्कार घटनेचा निषेध संपूर्ण देशभरातून होत आहे. पाली सारख्या छोट्या गावतुनही या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 19) सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला होता.
"एक संघर्ष समाजसेवेसाठी ग्रुपच्या" पुढाकाराने काढलेल्या या मार्चमध्ये पालीसह तालुक्यातील सर्व जाती धर्माचे लोक व महिला सहभागी झाले होते. येथील लवाटे चौक पासून या कँडल मार्चला सुरवात झाली.

शांततेत निघालेल्या या मार्चमध्ये हळू हळू अनेक लोक सहभागी होत गेले. अनेकांनी हातात मेणबत्त्या, निषेध व प्रबोधनात्मक संदेश असलेले फलक घेतले होते. येथील शिवाजी स्मारकाजवळ या कँडल मार्चची सांगता झाली. यावेळी अारिफ मनियार या तरुणाने व महा. अंनिस पाली-सुधागड शाखेचे प्रधान सचिव अमित निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. सर्वांनी मिळून अशा घटना कुठे घडत असतील तर त्या थांबवून प्रतिकार करु, अशा अाशयाची एक प्रतिज्ञा घेतली. शेवटी रमेश मुल्ल्या या तरुणाने उपस्थितांचे अाभार मानले. कँडल मार्चसाठी पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, पोलिस हवालदार प्रफुल्ल चांदोरकर, बिट मार्शल हंबीर यांच्यासह पाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Candal March Against Unnao And Kathua Incidents