वेंगुर्ले जलसमृद्ध होण्याची आशा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

टंचाईचे रडगाणे थांबणार - निशान तलावाची क्षमता वाढविणार
वेंगुर्ले - निसर्गसंपन्न अशा शहरात होणाऱ्या पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून हे संकट कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. तलावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामात धरणाची उंची अडीच मीटरने वाढविण्यासाठी १० कोटी रुपये त्वरित देण्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्य केले असून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्‍न यापुढे कायमस्वरूपी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

टंचाईचे रडगाणे थांबणार - निशान तलावाची क्षमता वाढविणार
वेंगुर्ले - निसर्गसंपन्न अशा शहरात होणाऱ्या पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करून हे संकट कायमस्वरुपी दूर करण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. तलावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामात धरणाची उंची अडीच मीटरने वाढविण्यासाठी १० कोटी रुपये त्वरित देण्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्य केले असून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्‍न यापुढे कायमस्वरूपी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरावर पाणीटंचाईचे संकट आहे. उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असतानाच पालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यापासून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना टंचाईची झळ जास्त प्रमाणात बसू नये, निशाण तलावातील पाणी किमान मे मध्ये तीन दिवस आड अशा पद्धतीने पुरवता यावे यासाठी टॅंकरनेही पाणीपुरवठा पालिकेतर्फे केला जातो. गेल्यावर्षी मे महिन्यात पालिका, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनी पाण्याचे मोफत वाटप केले होते.

ब्रिटिशकाळात शहराला नारायण तलावातून तसेच खासगी विहिरीमधून पाणीपुरवठा होत होता. कालांतराने शहराची व्याप्ती, कॅम्प, भटवाडी, वडखोल व रामघाटपर्यंत वाढली. या भागातील नागरिकांना खासगी विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. पुढे स्वातंत्र्यकाळात या नारायण तलावाची योग्य देखभाल न झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला. नारायण तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने वडखोल यथील भाग शहरात समाविष्ट केला.

त्या ठिकाणी असलेला नैसर्गिक सध्या शहराला पाणीपुरवठा करीत आहे. या तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावरील टाकीत घेऊन गुरुत्वाकर्षण प्रक्रियेद्वारे शहरात सोडले जाते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची क्षमता ७ लाख लिटर एवढी आहे. १९८० मध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या क्षमतेमध्ये आजपर्यंत पाण्याची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. २००४ पासून मीटर लावून घरगुती नळजोडण्याद्वो पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ६४ कनेक्‍शनवरुन नळ जोडण्याची संख्या १२०० च्या आजपर्यंत गेली आहे; परंतु पाणी साठवणूक क्षमतेमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी सोडविण्यासाठी निशान तलावाच्या दुसऱ्या टप्प्याला शासनाने तांत्रिक मंजुरी दिलेली होती. 

पाठपुराव्याला यश
पालिकेने सातत्याने पाठपुरावा करून धरणाच्या कामाला ६ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले; परंतु हा निधी पालिकेला मिळाला नव्हता; मात्र कालच पालकंमत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, पाणीपुरवठा सभापती सुमन निकम, नगरसेवक संदेश निकम, सुहाश गवंडळकर, तुषार सापळे, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांची भेट घेतली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला धरणाची उची अडीच मीटरने वाढविण्यासाठी १० कोटी तत्काळ देण्याचे श्री. लोणीकर यांनी मान्य केले.

Web Title: chance to vengurle water rich