आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करिअर निवडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

कणकवली : विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध होत आहेत. त्याचा वापर करून करिअरची क्षेत्रे निश्‍चित करा. कुठल्याही क्षेत्रात असला तरी तेथे आपली वेगळी ओळख निर्माण करा, असे आवाहन गौरीशंकर खोत यांनी फोंडाघाट येथे केले. 

कणकवली : विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध होत आहेत. त्याचा वापर करून करिअरची क्षेत्रे निश्‍चित करा. कुठल्याही क्षेत्रात असला तरी तेथे आपली वेगळी ओळख निर्माण करा, असे आवाहन गौरीशंकर खोत यांनी फोंडाघाट येथे केले. 

कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवलीतर्फे ज्ञातीतील दहावी-बारावी व इतर स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम फोंडाघाट येथील पूर्णानंद सभागृहात झाला. यात श्री. खोत यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या वेळी मडगाव येथील साहित्यिक अनिल परुळेकर, अर्थसेवा सल्लागार मनीष दाभोलकर, पत्रकार शेखर सामंत, कुडाळ येथील उद्योजक बापू नाईक, तालुकाध्यक्ष हेमंत परुळेकर, उपाध्यक्ष सुरेश सामंत, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर ऊर्फ अप्पी गवाणकर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ज्ञाती बांधव उपस्थित होते. 

शेखर सामंत म्हणाले, "कुडाळ देशकर ज्ञाती मंडळातर्फे चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञातीच्या उत्कर्षासाठी सहकार्य करणार आहे.‘‘
श्री. नाईक म्हणाले, "कणकवली ज्ञाती मंडळाने पूर्णानंद भवन उभारण्याचे हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. ज्ञाती बांधवांना एकत्र येण्यासाठी व ज्ञातीच्या विविध उपक्रमांसाठी या पूर्णानंद भवनाचा उपयोग होणार आहे.‘‘ कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञातीबांधवांतील कलाकारांनी संगीत रजनी सादर करत उपस्थितांची दाद मिळविली. बाबूराव सामंत यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण प्रभू यांनी आभार मानले.

दाभोलकर, नाईक यांच्याकडून देणगी
या वेळी मनीष दाभोलकर यांनी 1 लाखाची, तर श्री. नाईक यांनी 50 हजारांची देणगी ज्ञाती मंडळाला जाहीर केली. 

कोकण

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस...

12.33 AM

सावंतवाडी - चराठे वझरवाडीतील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने आईसोबत पैशांवरून भांडण झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

शनिवार, 24 जून 2017

महाड - भोर मार्गावर वाघजई घाटात उंबर्डे गावाजवळ कोसळलेली दरड हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरड कोसळल्याने या...

शनिवार, 24 जून 2017