मैफलींनी कानसेन तयार करणारी खल्वायन

मैफलींनी कानसेन तयार करणारी खल्वायन

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी शास्त्रीय मैफल आयोजित करून गेली वीस वर्षे येथील खल्वायन संस्थेने रत्नागिरीत सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत केली आहे. आजवर संस्थेच्या २३० मैफली व ३८ विशेष मैफली रंगल्या आहेत. कोकणात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा वाढीस लागावी, या हेतूने संस्था उपक्रम राबवते. संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्रासह दिल्ली, इंदूर, कारवार, गोव्यात प्रयोग होतात.

महाराष्ट्र शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत संस्थेने नवनवी नाटके सादर करून प्रथम पारितोषिके या संस्थेने पटकावली आहेत. खल्वायनची पहिली मासिक संगीत सभा ८ नोव्हेंबर १९९७ ला झाली. त्यानंतर विख्यात गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर, सौ. प्रणिती म्हात्रे, सौ. मंजिरी कर्वे-आलेगावकर, सौ. श्रुती सडोलीकर, सौ. निशा पारसनीस, सौ. पद्मजा तळवलकर, प्रल्हाद अडफडकर, अरविंद पिळगावकर, पं. रामकृष्णबुवा बेहेरे, पं. तुळशीदास बोरकर, डॉ. विद्याधर ओक, अश्‍विनी भिडे-देशपांडे, विजय कोपरकर आदी दिग्गजांसह स्थानिक कलाकारांनी मैफली रंगवल्या. आजवर २३० गायकांनी सादरीकरण केले. या सर्व मैफली श्रोत्यांसाठी विनामूल्य असतात. प्रतिवर्षी दोन म्हणजे गुढीपाडवा, दिवाळी पाडवा या विशेष संगीत मैफलींनाही रत्नागिरीकरांचा प्रतिसाद मिळतो. सोलोवादन, बासरी, व्हायोलिन, हार्मोनियम, पखवाज सोलो, सतारवादन आदी स्वतंत्र कार्यक्रम झाले आहेत. तसेच बालकलारांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यातून रत्नागिरीतील युवा कलाकारांना मार्गदर्शन मिळते तसेच ‘कानसेन’ तयार होतात. त्यामुळे खल्वायनच्या मैफलींना नेहमीच गर्दी पहायला मिळते.

‘खल्वायन’ची स्थापना
पराशर कुळातील आणि सामवेदावर विशेष प्रभुत्व असलेले महान ऋषी ‘खल्व’ यांच्या नावावरून संस्थेचे नामकरण खल्वायन असे केले. त्यामुळेच संगीत विषयक नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवून संस्थेने खल्व ऋषींचे नाव अजरामर केले आहे. संगीत व गद्य नाटकेही सादर करून राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
वीस वर्षांच्या वाटचालीत रत्नागिरीचे सांस्कृतिक वैभव वृद्धिंगत करण्यात आम्ही वाटा उचलला. संगीत राज्य नाट्य स्पर्धांना रत्नागिरीत होणारी प्रचंड गर्दी पाहता संस्थेच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळत आहे. खल्वायनचा आदर्श ठेवून अनेक नवीन संस्था उदयास येत आहेत.
- मनोहर जोशी, अध्यक्ष, खल्वायन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com