मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी घरी आलेल्या कुंटुंबियांना तिने आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी रुग्णालयात येत घटनेची माहिती घेतली. हर्षदा हिने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास केला जाईल असे पोलिस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. 

हर्षदा ही येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळताच तिच्या भावाला मोठा धक्काच बसला. तिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट न झाल्याने या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थिनींची आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com