कृषी पर्यटनाला पक्षी निरीक्षणाची जोड

कृषी पर्यटनाला पक्षी निरीक्षणाची जोड

गुहागर - तालुक्‍यातील पर्यटनामध्ये आकाशदर्शन, पक्षी निरीक्षण यांनाही स्थान मिळाले आहे. जंगलवाटा मळून पक्षी निरीक्षण, रात्री निरभ्र आकाशात ग्रह, तारे निरखणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी स्थानिकही तयार होत आहेत. 

गुहागरात प्रामुख्याने समुद्र पर्यटनासाठी पर्यटक येत. डोंगरदऱ्यातील अस्सल निसर्गाचा आनंद लुटणारा पर्यटकही आता येतो आहे. त्याला पक्षीनिरीक्षण व आकाश दर्शनाची जोड मिळत आहे. गुहागरातील अक्षय खरे आणि आबलोलीतील सचिन कारेकर पक्षी निरीक्षणाचा छंद पुरवतात. असगोलीतील नित्यानंद झगडे आकाशदर्शनाची सोय करतात.  

तालुक्‍यात हरोळी, पुसावा, चातक, लहान गोमटे, राखी बगळा, घार, सर्पगरुड, पोपट, कस्तुरी, मैना यासारखे १५० ते २०० प्रकारचे पक्षी दिसतात. खंड्या (किंगफिशर) जातीमध्ये तिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, छोटा खंड्या असे ९ प्रकार, लहान तसेच डोंगरी धनेशही (ककणेर) पाहायला मिळतात. 

पक्षी निरीक्षणासाठी अभ्यासकांसह पर्यटक अत्याधुनिक दुर्बिणी, कॅमेरे घेऊन येतात. त्यांना जंगलवाटांची माहिती अक्षय खरे, सचिन कारेकर असे तरुण देतात. हे तरुणही पक्षिनिरीक्षणात तरबेज झाले आहेत. एखादा नवा पक्षी आढळला की पुस्तके आणि इंटरनेटच्या मदतीने त्याची माहिती अभ्यासतात. पक्षांचे आवास, त्यांच्या लकबी, संकेत यांची माहितीही त्यांना झाली आहे. आबलोलीत सचिन कारेकर पर्यटकांना जंगलात नेऊन माहिती देतात. दुर्बिणीतून पक्षीही दाखवितात. अक्षय खरे यांच्या दुर्गापर्लला देशभरातील पक्षिनिरीक्षक येतात. झगडे यांचे कृषी पर्यटन केंद्र असगोलीत डोंगरावर आहे. त्यामुळे आकाशदर्शनाचा निखळ आनंद लुटता येतो. दिवाळी आणि उन्हाळी सुटीत मुलांसाठी आकाशदर्शन शिबिर भरविण्याचा त्यांचा मानस आहे. 
शहरातील मुलांना मून, स्टार पुस्तकातच दिसतात. तेथील झगमगाटात आकाशातील तारे पाहिले जात नाहीत. त्यांना जेव्हा चंद्र, तारे, चांदण्या निरभ्र आकाशात पाहायला मिळाल्यावर ती विस्मयचकित होतात. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे असतात. 
- नित्यानंद झगडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com