नोटाबंदीविरुद्ध कॉंग्रेसचा घंटानाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मालवण - तालुका कॉंग्रेसतर्फे पाचशे, हजार नोटाबंदीच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात घंटानाद व भजन आंदोलन छेडले. रद्द करा...रद्द करा... नोटाबंदी रद्द करा, युती सरकार...भाजप सरकार हाय...हाय... अशा घोषणा देत भाजप सरकारचा व नोटाबंदीचा या वेळी निषेध करण्यात आला. 

मालवण - तालुका कॉंग्रेसतर्फे पाचशे, हजार नोटाबंदीच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात घंटानाद व भजन आंदोलन छेडले. रद्द करा...रद्द करा... नोटाबंदी रद्द करा, युती सरकार...भाजप सरकार हाय...हाय... अशा घोषणा देत भाजप सरकारचा व नोटाबंदीचा या वेळी निषेध करण्यात आला. 

शहरातील देऊळवाडा येथील महापुरुष पिंपळपार येथील परिसरात कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारच्या निषेधार्थ आंदोलन झाले. या वेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, दिपक पाटकर, नगरसेवक यतीन खोत, जगदीश गावकर, बाबू गावकर, शरद गावकर, युवक कॉंग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, अभय कदम, चारुशीला आचरेकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, राजा गावकर, अनिल न्हिवेकर, किशोर खानोलकर, रवी मालवणकर, महिला तालुकाध्यक्षा पूजा वेरलकर, चारुशीला आढाव, महानंदा खानोलकर, नगरसेविका ममता वराडकर, अखिलेश शिंदे, राजू बिडये यांच्यासह कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. 

या वेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व नोटाबंदी करुण सूर भजनातून आळवत निषेध व्यक्त केला. टाळ आणि मुखात नोटाबंदीचा गजर करत अनोखे आंदोलन केले. 

नोटाबंदी व कॅशलेसमुळे जनतेच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात 70 ते 80 टक्‍के नागरिकांचे व्यवसाय सुरळीत सुरू होते; मात्र आता कॅशलेस व पाचशे, हजारच्या नोटाबंदीमुळे हे व्यवहार 30 टक्‍क्‍यांवर येऊन पोचले आहेत. सिंधुदुर्गच्या जनतेसमोर आर्थिक चणचण व मोठी समस्या आहे. जिल्हाभरात छेडण्यात येणाऱ्या या आंदोलनामुळे सरकारला नक्‍कीच जाग येईल आणि शासन आपल्या निर्णयात बदल करेल असा विश्‍वास आहे. निर्णयात बदल न झाल्यास यापुढे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल. 
- मंदार केणी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष

कोकण

कुडाळ - घावनळे ग्रामपंचायतीची मंगळवारची (ता. १५) ग्रामसभा ग्रामसभाध्यक्ष निवडीवरून वादळी ठरली. यात धक्काबुक्कीसह जिल्हा...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करून आर्थिक जीवनमान...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017