आमदार परिचारकांवर खेडमध्ये गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

खेड - आमदार प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड तालुकाध्यक्ष शरद शिवराम शिर्के यांनी दिली होती.

याबाबत शिर्के यांनी सांगितले की, पंढरपूर तालुक्‍यातील भोसे येथे 19 फेब्रुवारीला भाजपच्या जाहीर प्रचार सभेत आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रीय एकात्मकतेला बाधक असे देशद्रोही वक्‍तव्य केले. त्यांनी भारतीय सैनिक व वीरपत्नींबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांचे वक्तव्य अपमानास्पद व राष्ट्रीय एकात्मतेला बाधक म्हणून देशद्रोही आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी परिचारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: crime on mla prashant paricharak