आधार अपडेशन दापोलीत निराधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

दाभोळ - शासकीय योजनांसाठी आधारची सक्‍ती केली जाते. दापोली तालुक्‍यात आधार नोंदणी व आधार अपडेट करण्याचे काम बंद असल्याने विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभधारकांची गैरसोय होत आहे. दापोली तालुक्‍यात आधार नोंदणी व आधार अपटेड करण्याची कामे करण्याची दोन केंद्रे आहेत. या दोन्ही केंद्रांमध्ये आधारचे काम बंद असल्याचे सांगितले जात आहे.

गेले महिनाभर ही सेवा बंद झाल्याने नागरिकांना नवीन आधार नोंदणी आणि दुरुस्ती करणे अशक्‍य झाले आहे. शाळेतील विद्यार्थांना आधार क्रमांक नोंदणी अत्यावश्‍यक करण्यात आली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची नावेच आधारमध्ये चुकलेली आहेत. सध्या कृषी कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरले जात असून यासाठी शेतकरी पती व पत्नीच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत; मात्र पतीचा ठसा जुळत असला तर पत्नीच्या बोटांचे ठसे आधार यंत्रणेने घेतलेल्या ठशांशी जुळत नसल्याने शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. हे फॉर्म ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असून तोपर्यंत आधार कार्ड अपडेट न केल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीला मुकावे लागणार आहे. 

पॅन कार्डशी आधार नंबर जोडण्याची सक्‍ती केली जात असतानाच ज्यांच्या आधार कार्डवरील माहिती चुकीची आहे त्यांचा आधार क्रमांक पॅन नंबरशी लिंक होत नसल्याने आधार कार्डवरील माहितीत बदल करणे गरजेचे आहे; मात्र दापोली तालुक्‍यातील हे काम बंद असल्याने अनेक आयकर भरणारे करदाते अडचणीत आले आहेत. मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याबाबत हेच. विहित कालावधीत हे नंबर लिंक झाले नाही, तर मोबाईलचे सिम कार्ड बंद होणार या भीतीने अनेकजण त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात दापोली येथील तहसील कार्यालयात काही नागरिकांनी आधार सेवा केंद्र बंद असल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याने ही केंद्रे पुन्हा सुरू करावीत, अशी लेखी मागणी केली आहे.

Web Title: dabhol kokan news aadhar card updation