दापोली अर्बन'च्या सभासदांना 9 टक्के लाभांश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

दापोली : दापोली अर्बन बॅंकेचे कामकाज समाधानकारक सुरू असून, यावर्षी नफ्यात झालेल्या वाढीचा आलेख पुढील सहामाहीत यापेक्षाही उंचावलेला असेल, अशी ग्वाही दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली. सभासदांना 9 टक्के लाभांशही सर्वानुतमे मंजूर केला. बॅंकेची 57 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत दापोली शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवारी (ता.17) झाली.

ते म्हणाले, ""सभासदांसाठी बॅंकेकडून सहकार बॅंकिंग क्षेत्रातील माहिती व्हावी, यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींकडून मार्गदर्शन व अभ्यास शिबिराचे आयोजन पुढील महिन्यात केले जाईल.‘‘ नूतन संचालक मंडळाने बॅंकेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली नेमण्यात आलेल्या ऍडव्हायजरी कमिटीची माहिती सभागृहाला दिली.
या सर्वसाधारण सभेत मोठ्या ठेवीदारांना एकत्र करून त्यांना आवश्‍यक माहिती द्यावी, अशी सूचना जयंतराव भावे यांनी केली. यावर जालगांवकर यांनी ठेवीदारांना माहितीसाठी एकत्रित बोलावण्यापेक्षा आपण त्यांची भेट घेऊन कापण्यात येणारा टीडीएस आदी बदलांची माहिती देऊ, अशी ग्वाही दिली. सुधीर कालेकर यांनीही आवश्‍यक सूचना मांडल्या. बॅंकेचे सभासद जयंतराव भावे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार झाला. अर्बन बॅंकेचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव सभासद शिवाजी ऊर्फ दादा शिगवण यांनी सभागृहात मांडताच या ठरावाला सभागृहाने टाळया वाजवून मंजुरी दिली. पी. एस. कदम यांचे मनोगत झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय करंदीकर यांच्या अभिनंदनाचा व निवृत्तीनंतर त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा विशेष ठराव बॅंकेच्या संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष जयवंत जालगांवकर यांनी मांडला. 

Web Title: Dapoli arbana dividend of 9 per cent of the members

टॅग्स