५४ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणी

५४ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणी

दापोली - तालुक्‍याला उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी  दापोली पंचायत समितीकडून १ कोटी ८७ लाख २० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात ४१ गावांच्या ९३  वाड्यांमध्ये विंधन विहीर खोदाई,  १९ गावांच्या २३ नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि ३१ गावांच्या ५४ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठ्याचा समावेश आहे.

गतवर्षीपेक्षा १ कोटी २४ लाख रुपयांच्या वाढीव मागणीचा  पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गतवर्षी ६२ लाख ५० हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात ३० गावांच्या ७५ वाड्यांमध्ये विंधन विहीर खोदाई आणि ४१ गावांच्या ६३ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठ्याचा समावेश होता. यावर्षी संभावित टॅंकरने पाणीपुरवठ्याची गावांची आणि वाड्यांची संख्येत घट झाली आहे.

तालुक्‍यातील आंबवली बुद्रुक, कांगवई, पाजपंढरी, उंबरघर, रोवले, हर्णै, उसगाव, जालगाव, कोंडे, दमामे, तामोंड, आसुद, कुडावळे, म्हाळुंगे, मुरुड, शिर्दे, पिसई, आपटी आणि नानटे या एकूण १९ गावातील २३ नळपाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी ९५ लाख रुपयांच्या निधीची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे.

विंधन विहीरींच्या खोदाईसाठी  ४१ गावातील ९३ वाड्यांकरिता ५५लाख ८० हजार रुपयांची आवश्‍यकता  आहे. यामध्ये आतगाव, उंबरशेत, साकुर्डे, धानकोली, रेवली, डौली-हनुमानवाडी, बौध्दवाडी, गावराई, दाभिळ, गुडघे, उंबरघर, पणदेरी, उंबर्ले, पाजपंढरी, वाघिवणे, वांझळोली, हर्णै, उर्फी, देगाव, सारंग, कळंबट, सुकोंडी, कोंगळे, भोमडी, केळील, भोपण, आगरवायंगणी, देर्दे, कोंढे, दमामे, तामोंड या प्रमुख  गावांचा समावेश आहे.  टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित असलेल्या गावांमध्ये जामगे-देवाचाडोंगर, फरारे-मोगरेवाडी, आघारी तिवरे रहाटवाडी, आतगाव, उंबरशेत, उटांबर, धानकोली, पिसई, वनौशी तर्फे पंचनदी, दुमदेव, गुडघे, उंबरघर, पणदेरी, उंबर्ले, पांगारी तर्फे हवेली,  पाजपंढरी, रुखी, वाघिवणे, वांझळोली, कवडोली, रावतोली, मांदिवली, उर्फी, अडखळ, मुरुड, भाटी, ओणी, नवसे, भोपण, आगरवायंगणी, देर्दे, तेरेवायांगणी, आंबवली बुद्रुक, रोवले, शिवाजीनगर,  कोंढे, दमामे, तामोंड, तामसतीर्थ, गावराई या गावातील ५४ वाड्यांचा  टॅंकरने पाणीपुरवठ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. टॅंकरने पाणीपुरवठ्यासाठी १५ लाख ७५ हजार रुपयांचा  खर्च आहे.

तालुक्‍यातील तीन गावांच्या ३ वाड्यांना मार्च महिन्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे  प्रस्तावित आहे. यामध्ये जामगे-देवाचा डोंगर, आघारी  फरारे-मोगरेवाडी यांचा समावेश आहे. याकरिता सुमारे दीड लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यापासून आतगाव, उंबरशेत, उटांबर, धानकोली, पिसई, वनौशी तर्फे पंचनदी, दुमदेव, गुडघे, उंबरघर, पणदेरी, उंबर्ले, पांगारी तर्फे हवेली,  पाजपंढरी, रुखी, वाघिवणे, वांझळोली, कवडोली, रावतोली, मांदिवली, उर्फी, अडखळ, मुरुड, भाटी, ओणी, नवसे, भोपण, आगरवायंगणी, देर्दे, तेरेवायांगणी, आंबवली बुद्रूक, रोवले, शिवाजीनगर,  कोंढे, दमामे, तामोंड, तामसतीर्थ, गावराई, जालगाव, गिम्हवणे, आसूद, किन्हळ, केळशी या गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्‍यता असल्याने १५ लाख रुपयांची तरतूद आहे. दापोली तालुक्‍यात यंदा पर्जन्यमान गतवर्षांच्या तुलनेत चांगले झाल्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत पाणीपुरवठ्यासाठी मागणी यावर्षी कमी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com