तळवडे येथील एकाचा बुडून मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

सावंतवाडी - येथील मोती तलावाच्या काठावर बसलेल्या एकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. त्याला काही स्थानिक युवकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. हा प्रकार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील मोती तलावासमोर घडला. श्रीपाद गणेश कामत (वय ४८, रा. तळवडे) असे त्‍याचे नाव आहे. 

येथील श्रीराम वाचन मंदिरासमोर असलेल्या कठड्याच्या खाली संबंधित एक जण बसला होता; मात्र अचानक तोल गेल्याने तो पाण्यात पडला आणि गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार काठावर असलेल्या नागरिकांनी पाहिला; मात्र त्याला काढण्यासाठी कोणीही पुढे येईना. त्या ठिकाणावरून जाणाऱ्या बाहेरचावाडा येथे राहणाऱ्या कृष्णा धुळपनावर यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी आपला मित्र रॉजर डिसोझा, अनिस बिजली आणि रमेश सावंत यांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत संबंधिताच्या पोटात पाणी गेल्याने तो मृत झाला. 

तलावात कोणीतरी पडला आहे, ही माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली; मात्र पाण्याबाहेर काढलेली व्यक्ती अनोळखी असल्यामुळे मृतदेह तसाच ठेवून सर्वजण निघून गेले. काही वेळाने त्या ठिकाणी दाखल झालेले पोलिस सहायक निरीक्षक शिवाजी सावंत यांनी प्रसन्न राणे, गौतम साटेलकर यांच्या मदतीने मृतदेह कुटिर रुग्णालयाच्या शवागृहात हलविला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्‍यान श्रीपादचा भाऊ दत्तात्रय याने मृतदेह ताब्‍यात घेतला.

Web Title: death on drown

टॅग्स