विसर्जनादरम्यान कुडाळ येथे एकाचा बु़डून मृत्यू

महेश बारटक्के
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

जावळीपासून 2 किमी अंतरावरील सोनगाव येथील हेमंत प्रदीप वाघ वय 18 हा बारावीत शिकणारा युवक घरगुती गणपती विसर्जन करताना तेथिलच गुजरवाडी तलावात बुडून मृत्यू पावला. 

कुडाळ: जावळीपासून 2 किमी अंतरावरील सोनगाव येथील हेमंत प्रदीप वाघ वय 18 हा बारावीत शिकणारा युवक घरगुती गणपती विसर्जन करताना तेथिलच गुजरवाडी तलावात बुडून मृत्यू पावला. 

गणपती विसर्जन करून झाल्यावर परत येताना तो बुडाला. मात्र गर्दीमुळे तो बुडाल्याचे लक्षात आले नाही. अर्धा तास झाल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर तो पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्याला बाहेर काढून  तात्काळ कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान बहीण असा परिवार आहे
तो मेढा येथे बारावी इयत्तेत शिकत होता.