राणे भाजपमध्ये गेल्यास सिंधुदूर्गच्या राजकारणावर परिणाम नाही: केसरकर

प्रकाश तिराळे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मुरगूड येथील नगरपालिकेच्या विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी नाम.दिपक केसरकर आले असता पत्रकारांनी नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत. याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते.

मुरगुड : भाजप आमचा मित्र पक्ष आहे. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासने पाळली गेली पाहिजेत भाजप काही तत्वावर काम करणारा पक्ष आहे राणेंचे चरित्र काय आहे त्यांनी केलेले खून हे तपासून पहिले आहे काय ? भाजप राजकारणासाठी तत्वाला मुरड घालणार आहे काय ? असा सवाल करुन राणे भाजप मध्ये गेले तरी सिंधुदूर्गच्या राजकारणावर कांहीही परिणाम होणार नाही.असे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मुरगूड येथील नगरपालिकेच्या विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी नाम.दिपक केसरकर आले असता पत्रकारांनी नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत. याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते.

केसरकर म्हणाले, राणेंच्या गैर कारभाराच्या बातम्या वृत्त पात्रातून छापून आल्या.त्याच्यावर काय कारवाई झाली ? मी राज्यशासनाचा प्रतिनिधी आहे राणेंचा विरोधक म्हणून मला मंत्रिपद मिळालेले नाही . अनेक खुनाचा छडा लागलेला नाही.  हा सवाल राज्यातील जनतेने केला पाहिजे. त्यांच्या मुलाची पार्श्वभूमी काय आहे अकरा क्रिमिनल केसेस कशा तयार होतात ? रस्त्यावरून गाडीला ओव्हर टेक करणाऱ्या ड्रायव्हरला सुद्धा त्यांनी मारहाण केली आहे . रस्ते सर्वांसाठी असतात लोकशाही आहे 
पण ते लोकशाहीच मानत नाहीत.  अनिष्ट प्रवृत्तीना विरोध करणं हे माझे सुरवातीपासूनचे तत्व आहे त्यामुळे नारायण राणे भाजपमध्ये गेले तरी त्याचा कोणताही परिणाम कोकणच्या राजकारणावर होणार नाही, असेही शेवटी केसरकर म्हणाले.