'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…

Cycle
Cycle

पाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या "अजुबा सायकलवर" स्वच्छता, एकात्मता, समता अाणि बंधुतेचा संदेश घेवून भारत भ्रमणाला निघाला आहे. या अजुबा सायकलला ब्रेक, सिट, चैन, गेअर व बेल यातले काहीच साधन नाही. नुकतेच त्यांनी रायगड जिल्ह्यातून मार्गक्रमण केले. त्यावेळी सकाळने या अवलियाच्या मिशनचा घेतलेला प्रेरणादाय़ी अाढावा.

देबेंद्रनाथ बेरा (वय.४५) हे पच्छिम बंगालमधील पच्छिम मदिनीपुरा जिल्ह्यातील सबंग या छोट्या गावातील रहिवाशी आहेत. अापण स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावावा तसेच संपुर्ण भारतभर एकात्मता, समता अाणि बंधूतेचा संदेश द्यावा व त्याबरोबरच गिनिज वर्ड रेकाॅर्ड करावा या ध्येयाने ते हि अजुबा सायकल घेवून स्वखर्चाने निघाले आहेत. त्यांचा हा प्रवास खुपच थरारक अाणि प्रेरणादायी आहे. ब्रेक, सिट, चैन, गेअर नसलेली अजुबा सायकल घेवून देबेंद्रनाथ बेरा १७ जुनला अापल्या गावातून निघाले. अात्ता पर्यंत त्यांनी २३ राज्य पादाक्रांत करुन जवळपास १३ हजार किलोमीटरचे अंतर पार केले आहे. अजुन तीन महिन्यांनी ते भारतातील सर्व राज्य पादाक्रांत करुन गिनीज वर्ड रेकाॅर्ड व लिम्का बुक अाॅफ रेकाॅर्ड करणार आहेत. सोमवारी (ता.१५) महाराष्ट्राची सीमा पार करुन ते गोवा राज्यात पोहोचले आहेत. तेथून ते बैंगलोरला अाणि नंतर पुढे जाणार आहेत. या प्रवासात त्यांचा सहकारी अाकाश कुमार करण त्यांच्या सोबत अाहे. अाकाश करण हा दुसर्या सर्वसामान्य सायकलवर सामान लादून बेरा यांच्या सोबत चालतो.

देबेंद्रनाथ बेरा यांचे लग्न झालेले नाही. त्यांना दोन भाऊ अाहेत. आपल्या गावी ते दोन अाजोबांसह राहतात. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी हि अजुबा सायकल शिकण्यास सुरुवात केली. मुंबई येथील नजरुल इस्लाम हे त्यांचे गुरु अाहेत. बेरा यांनी १९-२० वर्षाचे असतांना सायकल सर्कस सुरु केली अाणि त्यावरच त्यांचा उदर्निवाह चालत आहे. त्यांचे दोन असिस्टंत अाहेत.

भारत मातेवर निस्सीम प्रेम करणारे अाणि अत्यंत राष्ट्रभक्तिने भारावलेले बेरा यांनी केवळ रेकाॅर्ड करण्यासाठी नाही तर देशात एकात्मकता, समता अाणि बंधूतेचा संदेश देण्यासाठी हे मिशन सुरु केले आहे. त्यांना अशा प्रकारे सायकल चालवितांना बघुन ठिकठिकाणी त्यांच्या जवळ लोक जमा होतात. मग यावेळी बेरा जमलेल्या लोकांचे प्रबोधन करतात. स्वखर्चाने निघालो असलो तरी जमलेले लोक स्वखूशीने पैसे व खाण्यास देतात व सहकार्य देखिल करतात. असे विवीध सकारात्मक अनुभव देबेंद्रनाथ बेरा यांनी सकाळला सांगितले.

हि अजुबा सायकल बेरा मोठ्या शिताफीने चालवितात. या सायकलला चैन व गेअर नसल्याने ते पुढे वाकून अापल्या दोन्ही हातांनी सायकलचे पुढचे चाक फिरवितात अाणि अशा प्रकारे पुढे जातात. सायकल थांबवितांना देखिल पुढील चाक दोन्हि हातांनी पकडत ब्रेक लावतात. सिट नसल्याने बसण्याचा प्रश्नच येत नाही. महामार्गावर अशा प्रकारे सायकल चालविणे मोठे जिकरीचे व धोक्याचे अाहे. याबाबत अापल्याला भिती वाटत नसल्याचे बेरा म्हणाले. तसेच त्रास अाणि कष्ट देखिल होत नाही असे बेरा यांनी सांगितले. पण त्यांचे कष्ट अाणि प्रयत्न पाहुन त्यांच्या जिद्दिला सलाम केल्याशिवाय कोणी राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com