दुभाजकांमधील ‘शॉर्टकट’बाबत असमान निर्णयाने नाराजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शॉर्टकट कसे सुरू होतात?
रत्नागिरी - रत्नागिरी शहरात मारुती मंदिर ते जयस्तंभ परिसरातील दुभाजकांमधील शॉटकर्ट वाहतूक विभागाकडून अडथळे टाकून बंद करण्यात आले आहेत. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त केल्या जात आहेत. काहींनी त्याचे स्वागत केले असले, तरी मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अडथळे टाकून बंद केलेले शॉर्टकट पुन्हा सुरू केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना समान न्याय देण्याची मागणी नागरिकांकडून सोशल मीडियावर व्यक्‍त केली जात आहे.

मारुती मंदिरपासून माळनाक्‍यापर्यंत जिथे दुभाजकाला कट आहे, तेथून वळता येते. तिथे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अडथळे ठेवले आहेत. हे अडथळे ज्या दिवशी थिबा राजाचे नातेवाईक आले, तेव्हापासून आहेत. हिंदू कॉलनीच्या समोरून संगमकडे जायचं असेल तर माळनाक्‍यात जाऊन वळून यावं लागतं. ही नागरिकांची गैरसोय आहे. या त्रासाची कुणालाच काही पडलेली नाही. सगळीकडे मनमानी सुरू आहे. त्यात वेळ, पेट्रोल आणि पैशांचा अपव्यय होतो, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मंत्री यायचे असले, की दुभाजकांमध्ये ठेवलेले अडथळे बाजूला केले जातात. नागरिकांना एक न्याय आणि मंत्र्यांना दुसरा असे का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मारुती मंदिर ते मध्यवर्ती बस स्थानक आणि मारुती मंदिर ते माळनाका परिसरात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेजवळील अडथळे दूर केले आहेत, ते कोणामुळे असा सवाल योगेंद्र सावंत यांनी उपस्थित केला आहे. जिथे रहदारीचे प्रमाण जास्त आहे, तेथील मार्ग बंद करणे योग्य ठरेल. एसटी कॉलनीजवळ रहदारी नाही. तेथील मार्ग बंद करण्यामागील कारण समजलेले नाही, असे मत नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.