मार्लेश्‍वरचे रुपडे पालटण्यावर भर - वायकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

देवरूख - ‘‘पर्यटन विकासाच्या माध्यमातून विविध विकासकामांद्वारे मार्लेश्‍वरची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आता येथील अपूर्ण पायाभूत सोयीसुविधा पूर्ण करून मार्लेश्‍वरचे रुपडे पालटण्यावर आपला भर राहील,’’ असे सांगत पर्यटनवाढ हवी असेल तर प्रत्येकाने स्वच्छता अंगीकारावी, असा सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिला.

प्रादेशिक पर्यटन व ‘क’ वर्ग पर्यटन याअंतर्गत मार्लेश्‍वरमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन वायकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. 

कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, सौ. मुग्धा जागुष्टे, सभापती सारिका जाधव, उपसभापती दिलीप सावंत, पंचाय समिती सदस्या सौ. शीतल करंबेळे, छोट्या गवाणकर, जनक जागुष्टे यांच्यासह शासकीय खात्यांचे अधिकारी आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच विश्‍वस्त उपस्थित होते. देवस्थान समितीच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार झाला.

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छतेसंदर्भात मार्लेश्‍वरात लावण्यात आलेल्या फलकांचे कौतुक करून त्यानुसार भाविक आणि व्यापाऱ्यांनी आपले आचरण ठेवण्याचे आवाहन करून या पवित्र क्षेत्रावर घाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

या क्षेत्रासाठी ३० मार्च २०१७ ला १९०.६५ लक्ष किमतीच्या कामाला मंजुरी दिली असून, याअंतर्गत सभामंडप बांधणे, झाकलेले पथदीप बांधणे आदी कामांचे सविस्तर अंदाजपत्रक, आराखडे तयार करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सभामंडप बांधणे, भक्‍त निवास, स्वच्छतागृह बांधणे, पूल बांधणे, पाखाडी, संरक्षण भिंत, पालखी निवारा शेड, पार्किंग स्थळाची डागडुजी असा प्रस्ताव पर्यटन व सांस्कृतिक विभाग मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख महाडिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.