मधुमेहाला दूरच ठेवा

मधुमेहाला दूरच ठेवा


भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस शुक्रवारी (ता. 28) धन्वंतरी जयंतीच्या दिवशी साजरा झाला. या वर्षी "मधुमेह (डायबेटीस) प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय'' या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मधुमेह अर्थात डायबेटीस या व्याधीस आयुर्वेदामध्ये प्रमेह असे संबोधले जाते. या व्याधीमध्ये वारंवार व अतिप्रमाणात गढूळ लघवी होणे ही मुख्य लक्षणे आहेत. मधुमेह ही प्रमेहाची अंतिम अवस्था आहे. हा आजार देशात वेगाने पसरतो आहे. सिंधुदुर्गही याला अपवाद नाही.
विविध घटकांच्या अतिरिक्त सेवनाने व अयोग्य जीवनशैलीमुळे शरीरातील वात-पित्त-कफ बिघडतात विशेषतः कफ दोष अतिरिक्त प्रमाणात वाढतो व शरीरातील मेद धातू व मांसधातू यांना बिघडवितो. याच कारणांनी शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात क्‍लेद नावाचे विषद्रव्ये साठत रहाते व शरीरातील सर्वच धातुंना दूषित करते. हा क्‍लेद सातत्याने लघवीच्या वाटे शरीराबाहेर जात रहातो व माणसाला अतिरिक्त प्रमाणात व वारंवार गढूळ लघवी होत राहते. त्यालाच प्रमेह असे म्हणतात. हाच प्रमेह पुढे मधुमेहात रुपांतरित होतो व माणसाच्या रक्तात व लघवीमध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण आढळते. शरीरात अतिरिक्त प्रमाणात साठलेल्या कफामुळे व क्‍लेद या विषद्रव्यामुळे शरीरातील पचनशक्ती मंदावते, चयापचय प्रक्रियेमध्ये बिघाड उत्पन्न होतो व मधुमेह व्याधी होतो आज (ता. 14) मधुमेह दिन आहे. या पार्श्‍वभूमीवर मधुमेहाबाबत घ्यावयाच्या खबरदारी याविषयी...


आहारातील कारणे
* दूध व दुधापासूान तयार केलेले दही, मिठाई आदी पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन, साठवून न ठेवता खाल्ली जाणारी नवीन सर्व धान्ये (गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी) यांचे सातत्याने सेवन
* साखर व गूळ यांच्या पदार्थांचे तसेच उसाचा रस, काकवी, चॉकलेटस, आईस्क्रीम, मलईयुक्त पदार्थ, खव्यासारख्या गोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन
* मैद्याचे पदार्थ अर्थात केक, पेस्ट्रीज, ब्रेड यांचे अतिरिक्त सेवन
* मांसाहाराचे अतिरिक्त सेवन
* पचायला ज असलेल्या पदार्थाचे अतिप्रमाणात व वारंवार सेवन
* पिष्टमय पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन
* शीतपेयांचे अतिरिक्त सेवन
* मद्यपान, चहा व कॉफी यांचे अतिरिक्त सेवन
* तेलकट, तुपकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन
* आंबवून तयार केलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन* शिळे अन्न, फ्रिजमद्ये दीर्घकाळ ठेवलेले अन्न सातत्याने खाणे
* दूध व फळे एकत्र करून खाणे जसे मिल्क शेख, फ्रुटसॅलेड इ.
----------------
विहारातील कारणे
* व्यायाम अजिबात न करणे, बैठे काम, एकाच जागी बसून राहणे
* सतत झोपून राहणे
* दिवसा झोपणे व रात्री जागरण
* नैसर्गिक वेगांचे जसे लघवी, भूक, तहान, झोप, ढेकर, जांभई, खोकला, उलटी यांना दाबून ठेवणे
* अवेळी भोजन
* भूक लागली असताना चहा व अन्य पेयाचे सेवन
* आवश्‍यकता नसताना पाणी पिणे, तहान लागली असताना कोल्ड्रिंक्‍स, चहा कॉफी पिणे
* स्टिरॉडेडसारख्या औषधांचे अतिरेकी सेवन
--------------
मानसिक कारणे
* अवाजवी महत्त्वाकांक्षेसाठी शारीरिक व मानसिक धावपळ करणे
* विश्रांती अजिबात न घेणे, सतत चिंताग्रस्त
* मानसिक ताणतणाव व स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी मनावर सतत दडपण
* अवाजवी भीती, शोक, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष या भावनांना आवर न घालणे
-------------
मधुमेहाची सामान्य लक्षणे
* वारंवार जास्त प्रमाणात गढूळ लघवी
* अतिरिक्त घाम, घामाला दुर्गंधी येणे
* सतत बसून व झोपून ऱ्हावेसे वाटणे
* हृदय, डोळा, कान, नाक,जीभ, दात, हिरड्या या ठिकाणी जास्त मळ निर्माण होणे
* दातांच्या ठिकाणी चिकटपणा
* नख व केस यांची अधिक प्रमाणात वाढ
* सतत तहान व घशाला कोरड
* सारखी भूक, हातापायाची आग होणे
* तोंडामध्ये गोडपणा
* थंड पदार्थाची अतिरिक्त इच्छा निर्माण होणे
* अचानक व अकारण शरीराचे वजन वाढणे किंवा कमी होणे
* जाडी वाढत जाणे व पोट सुटणे
---------------
प्रतिबंधात्मक उपाय
* आहारात्मक, विहारात्मक व मानसिक कारणे टाळणे
* झोपेचे नियम पाळणे
* भुकेची वेळ व तहानेची वेळ पाळणे
* आयुर्वेदानुसार नियमितपणे शरीर शोधनाचे उपचार जसे उलटीचे औषध (वमन), जुलाबाचे औषध (विरेचन), पिचकारी (बस्ती) वैद्यकिय सल्ल्याने करून घेणे
* शरीराची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी रसायन औषधांचा वापर करणे
* नियमित व नियंत्रित स्वरुपाचा व्यायाम च
* योगसाने, प्राणायाम, ध्यान या गोष्टीचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आचरण करणे
----------------------
मधुमेहातील पथ्ये
* खाण्यामध्ये सातूचे पिठ त्यापासून तयार केलेली भाकरी, लापशी आदीचा वापर
* जुने धान्य, अथवा धान्य भाजून वापरावे
* ताज्या भाज्या-शेवगा, शेपू, माठ, पालक, मेथी, कारले, तोंडले व वेलीवरच्या भाज्यांचे सेवन
* संत्री, मोसंबी, पपई, डाळिंबा, आवळा, कवठ, काळ्या मनूका, जर्दाळू यांचा वापर
* जवस, जवसाची चटणी यांचे नियमित सेवन करावे
* कडधान्य-मूग, कुळीथ, तूर, हरभरे, मटकी मसूर आदींचा वापर

हे टाळावे
* साखर, गूळ व अन्य गोड पदार्थांचा त्याग
* फळामध्ये केळी, सीताफळ, आंबा, चिकू यांचे अतिरिक्त प्रमाण टाळणे
* दूध, सोडा, मैदा, डालडा यांचे सेवन टाळणे
* अतिरिक्त प्रमाणात मिठाचे व मिठयुक्त पदार्थांचे अतिरिक्त व वारंवार सेवन टाळणे
* मिठाचे अतिरिक्त प्रमाणात सेवन टाळावे
* कोल्ड्रिंक्‍स, फालुदा, आईस्क्रीम पदार्थ टाळावेत

देशात वाढताहेत
मधुमेहाचे रुग्ण
* 2000- 25814117
* 2005- 31039932
* 2010- 37671965
* 2015- 45809149

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com