केबलसाठीच्या खोदाईमुळे पडवे माजगावात रस्ता धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

कोलझर -बीएसएनएलसाठी केबल टाकणाऱ्या यंत्रणेच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे डेगवे ते पडवे माजगाव रस्ता धोकादायक बनला आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यात चर खोदून माती टाकल्याने धोका निर्माण झाला आहे.

कोलझर -बीएसएनएलसाठी केबल टाकणाऱ्या यंत्रणेच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे डेगवे ते पडवे माजगाव रस्ता धोकादायक बनला आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यात चर खोदून माती टाकल्याने धोका निर्माण झाला आहे.

बांद्याहून तळकट, कुंब्रल परिसराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने ये-जा करतात. डेगवे हात स्टॉप ते पडवे माजगाव या दरम्यान अरुंद आणि खड्डेमय रस्ता आहे. आठ दिवसांपूर्वी या रस्त्यालगत अचानक केबल टाकण्यासाठी खोदाई सुरू करण्यात आली. याबाबत कोणत्याही प्रकारचा सूचना फलक किंवा अन्य मार्गदर्शक व्यवस्था केली गेली नाही. संबंधित कामगारांकडे चौकशी केली असता ठेकेदारामार्फत बीएसएनएलसाठी ही केबल टाकली जात असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता संबंधित काम केंद्र सरकारचे असल्याने आम्ही काहीच हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगण्यात आले.

ही खोदाई करून माती थेट रस्त्यावर ओतली गेली. यासाठी जेसीबी दिवस-रात्र सुरू आहे. त्यामुळे आधीच खड्डेमय असलेल्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. माती रस्त्यात असल्याने तीनचाकी गाडीही जाणार नाही इतका रस्ता शिल्लक राहिला आहे. आठ दिवस असाच प्रकार असल्याने या मार्गावरून वाहने चालविणे कठीण बनले आहे. शिवाय परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वाहतूक व्यवस्थेसाठी कोणीच व्यक्ती किंवा यंत्रणा नसल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करावी आणि धूळ उडू नये म्हणून प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे. आवश्‍यक तितक्‍या भागाचीच खोदाई करून केबल टाकावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोकण

गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी -...

08.57 AM

विद्यार्थ्यांची सोय लगतच्या शाळेत : 50 शिक्षक अतिरिक्‍त ठरणार कणकवली -...

08.57 AM

दहा हजार हेक्‍टरचे लक्ष्य - मनरेगाअंतर्गत नियोजनाअभावी योजनेचा बोजवारा...

08.57 AM