जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर आज दिवसभर कायम होता. समाधानकारक पावसामुळे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सुमारे 90 टक्‍के लावण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर आज दिवसभर कायम होता. समाधानकारक पावसामुळे लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सुमारे 90 टक्‍के लावण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 99.78 मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड- 100, दापोली- 88, खेड- 89, गुहागर- 125, चिपळूण- 65, संगमेश्‍वर- 60, रत्नागिरी- 148, लांजा- 89, राजापूर- 134 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जूनपासून जिल्ह्यात सरासरी 2040 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी 1174.22 मि.मी.ची नोंद होती. तुलनेत जिल्ह्यात नऊशे मि.मी. अधिक पाऊस पडला आहे. जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. दोन दिवस विश्रांती घेणाऱ्या पावसाने पुन्हा सुरवात केली आहे; परंतु पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भातावर कीडरोग पडण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. अमावस्येच्या उधाणाने किनारी भागांना जबरदस्त तडाखा दिला होता. त्यामुळे पौर्णिमेच्या उधाणाची भीती किनारीवासीयांना होती. मात्र, तेवढा वेग नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

कोकण

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) - नियोजित मुंबई-गोवा महामार्गाचा भूमिपूजन समारंभ सुरू होण्यापुर्वीच भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे...

04.36 PM

कालवे बंदिस्त पाईपलाईनचे - ५८ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली; १२ वर्षे अपूर्ण अवस्थेत रत्नागिरी - जिल्ह्यात येत्या दोन...

03.51 PM

हिंदी चित्रपट पाहण्यास पसंती - प्रवासी वाढीसाठी फायदेशीर दापोली - वाढत्या स्मार्ट फोनधारकांच्या संख्येमुळे सार्वजनिक...

03.45 PM