डॉ.सायली कंक रायगडातील पहिली वैद्यकीय अधिकारी

Dr. Sayli Kank, the first medical officer in Raigad
Dr. Sayli Kank, the first medical officer in Raigad

महाड : महाड तालुक्याला असलेल्या सैनिकी परंपरेत आणखी एक भर पडली असुन भारतीय सैन्य दलाच्या आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये येथील डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रुजु झाली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये दाखल होणारी सायली हि रायगड जिल्ह्यातील पहिलीच तरुणी ठरली आहे. 

कुलाबा मुंबई येथील आयएनएचएस अश्वीनी या लष्करी तळावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. आपले माध्यमिक शिक्षण महाडच्या नवयुग विद्यापीठ ट्रस्टमधून पूर्ण कल्यानंतर सायलीने उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुण्यात घेतले. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. 

सर जे.जे. रुग्णालयातून एम.डी करीत असतानाच तिचे आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परिक्षा दिली आणि त्यात यशस्वी होऊन मार्च 2018 च्या बॅचची अधिकारी म्हणून ती भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. महाड काकरतळे भागात राहणारी डॉ. सायली ही भारतीय सेन्याच्या वैद्यकीय सेवेत दाखल होणारी रायगडची पहिलीच कन्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com