ई-वॉलेट, मोबाइल वॉलेट, इंटरनेट बॅंकिंगची माहिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

रत्नागिरी - कॅशलेस अर्थव्यवस्थेनुसार व्यवहारासाठी कॅश/रोख रक्‍कम वापरण्याऐवजी इतर पर्याय वापरले जातात. जसे प्लास्टिक मनी, ई-वॉलेट, इंटरनेट बॅंकिंग. ज्यामध्ये छापील नोटांचा समावेश नसतो. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची नक्‍कीच गरज आहे. फोनचा वापर करून ही व्यवस्था मोठ्या प्रमाणात अमलात आणता येते; परंतु याबाबत पुरेशी माहिती नसल्याने व्यवहार करताना अडचणी येतात. याचाच विचार करून ‘सकाळ-मधुरांगण’ आणि जनता सहकारी बॅंकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे ‘आज रोख, उद्या डिजिटल’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य सर्वांसाठी खुला आहे. 

हा कार्यक्रम २९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी वॉलेट मनी ही संकल्पना रुजू लागली आहे. त्याचा अर्थ काय, वापर कसा, फायदे-तोटे, समज-गैरसमज या व्याख्यातून ठाकूर उलगडून सांगणार आहेत. चलनी नोटांशिवाय व्यवहार कसे सुरळीत होऊ शकतात याबाबत स्लाइड-शोद्वारे सोप्या शब्दात हजाराहून अधिक लोकोपयोगी व्याख्यानांचा विक्रम करणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरेही देणार आहेत. ठाकूर यांचे ‘आज रोख उद्या डिजिटल’ या विषयावरही एक हजारहून अधिक सेमिनार झाले आहेत. 

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. मधुरांगण सभासदांसोबतच शहरातील तसेच शहराबाहेरील सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ-मधुरांगण’तर्फे करण्यात आले आहे.

जनता सहकारी बॅंकेचे प्रायोजकत्व...
या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील शिवाजीनगर येथील जनता सहकारी बॅंकेचे प्रायोजकत्व मिळाले आहे. जनता बॅंकेच्या इंटरनेट बॅंकिंग सुविधा, मोबाइल बॅंकिंग सुविधा, जनता रुपे डेबिट कार्ड, कार्ड स्वाइप मशिन आदी अद्ययावत सुविधांच्या साह्याने प्रत्येक व्यवहार करा कॅशलेस. कारण जनता बॅंक सदैव तुमच्याबरोबर असणार आहे. जनता बॅंकेकडून सामाजिक क्षेत्राबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. 

लांजा येथे रविवारी कार्यक्रम
हा कार्यक्रम लांजा येथील पंचायत समिती सभागृहात रविवारी (ता.२९) सकाळी ११ ते १ या वेळेत होणार असून, यासाठी लांजा कुणबी विकास सहकारी पतसंस्‍थेचे प्रायोजकत्‍व मिळाले आहे.

कोकण

कुडाळ - घावनळे ग्रामपंचायतीची मंगळवारची (ता. १५) ग्रामसभा ग्रामसभाध्यक्ष निवडीवरून वादळी ठरली. यात धक्काबुक्कीसह जिल्हा...

12.45 PM

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता आहे. याच नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करून आर्थिक जीवनमान...

12.39 PM

चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची...

12.33 PM