गड संवर्धनाबरोबर शैक्षणिक मदत व गड-किल्ले जनजागृती

konkan
konkan

पाली - दुर्गवीर प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करत आहे. त्याचबरोबर या किल्ल्यांच्या सभोवताली असलेल्या आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील करतात. नुकतेच सुधागड तालुक्यातील किल्ले मृगगड घेऱ्यातील परळी येथील विकासवाडी, पाली येथील दोन शाळा आणि माणगाव तालुक्यातील मानगड परिसरातील एका शाळेतील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना सेवा सहयोग व दुर्गवीर प्रतिष्ठानकडून शालेय साहित्य वाटप करुन 
गड जनजागृती उपक्रम करण्यात आला.

शिक्षण आणि परिस्थिती एका वर्तुळात गुंफलेले असतात. काहीजण परिस्थिती नाही म्हणून शिकू शकत नाहीत आणि शिक्षण नाही म्हणून त्यांची परिस्थिती सुधारत नाही. या अश्या वर्तुळातील परिस्थिती सुधारण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा सहयोग यांच्या मार्फत आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटप करण्यात येत आहे.  

दरवर्षी ३५०-४०० शालेय विद्यार्थ्याना शालेय वस्तु वाटप करण्याचा संकल्प करण्यात येतो. यावेळी वाटपासाठी संतोष हसुरकर, संस्कृती हसुरकर, सागर टक्के, योगेश गवाणकर, सचिन रेडेकर, समीर शिंदे, सचिन जगताप, धिरज लोके, रामजी कदम हे दुर्गवीर सदस्य उपस्थित होते. पुढील टप्प्यातील वाटप संगमेश्वर, कोल्हापूर, नाशिक येथील दुर्गम भागात देखील संपन्न झाले आहे अशी माहिती दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य धीरज लोके यांनी सकाळला दिली.

शिक्षण आणि प्रगती एकत्र हात घालून चालतात पण परिस्थिती यात अडथळा ठरणार असेल तर आम्ही दुर्गवीर म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करू
संतोष हसुरकर, अध्यक्ष , दुर्गवीर प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com