वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना शॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मंडणगड - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या तालुक्‍यातील वीज ग्राहकांना वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा बिलांबरोबरच एका महिन्यात दोन देयक सादर करून शॉक दिल्याची तक्रारी ग्रामीण भागातील ग्राहक करीत आहेत. अंदाजे केलेली वीजआकारणी, विविध प्रकारचे कर व अधिभार याचबरोबर २० दिवसांत बिले येण्याच्या कार्यपद्धतीमुळे ९० टक्‍क्‍यांहून अधिक वसुली असलेल्या शेती व व औद्योगिक कारणांसाठी विजेचा अत्यल्प वापर असलेल्या तालुक्‍यातील ग्राहकांचे कंबरडे दरमहा येणाऱ्या बिलामुळे मोडले आहे. 

माहिती तंत्रज्ञानाच्या अंगीकारासह लोकाभिमुख प्रशासनाचा दावा करणाऱ्या व्यवस्थापनाने कामकाजात सुधारणा केलेली नाही. वीज बिल कमी करण्यासाठी नागरिकांना खेटे मारावे लागतात. वाढती वीजबिले येऊ नयेत यासाठी आता प्रत्येक ग्राहकाला स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. आपल्या घरी मीटरचे रीडिंग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ओळखपत्र पाहूनच त्या व्यक्तीस मीटर रीडिंगसाठी फोटो काढण्याची परवानगी ग्राहकाने देणे गरजेचे आहे. आपल्याकडे स्वतंत्र वही ठेऊन रीडिंगसाठी आलेल्या व्यक्तीचे नाव रीडिंग घेतल्या तारखेला त्याची सही असा तपशील ग्राहकाकडे हवा. 

३० दिवसांतच रीडिंग घ्यायला हवे
सध्या १०० युनिटपर्यंत ३.७६ रुपये प्रतियुनिट दर आहे, परंतु रीडिंग ३० दिवसांनंतर घेतल्यामुळे व रीडिंग १०० च्या वर गेल्याने हाच दर दुप्पट म्हणजेच ७.२१ रुपये प्रतियुनिट होतो. त्याचा सामान्य जनतेस भुर्दंड पडतो. सरासरी, अंदाजे किंवा मीटरचा फोटो न काढता वीजबिल आकारणे बेकायदेशीर आहे. थकबाकी, वादग्रस्त बिल याकरिता वीजपुरवठा बंद करण्यासाठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.