महावितरणचे अडीच कोटी बिल थकीत

महावितरणचे अडीच कोटी बिल थकीत

कणकवली - जिल्ह्यात कणकवली विभागातील नळपाणी पुरवठा योजनांचे ४० लाख तर कुडाळ विभागातील घरगुती आणि पाणीपुरवठा योजनांमधील दोन कोटी ११ लाख मिळून जवळपास अडीच कोटी रुपये वीज बिल थकीत राहिले आहे. महावितरण कंपनीने थकीत बिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली असून थकीत बिल असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची भीती आहे. ग्राहकांनी वीज बिल भरणा करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे यांनी केले आहे. 

महावितरण कंपनीचे खासगीकरण झाल्यापासून ग्राहकांच्या दृष्टीने काही फायदे झाले आहेत. जिल्ह्यात चांगली वसुली असल्याने सिंधुुदुर्ग भारमानमुक्त आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या नळपाणी पुरवठा योजना आणि काही निवडक ग्राहकांकडून वीज बिल भरण्यासाठी होणारा विलंब पाहता थकीतच्या रकमेचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यातील ग्राहकांकडून वीज बिल वेळीच भरणा होत असते. परंतु आर्थिक वर्षअखेर वीज वितरणतर्फे शंभर टक्के बिलाच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले जाते. याचबरोबर काही वर्षे थकीत असलेल्या ग्राहकांना महत्त्वाकांक्षी योजनामधून दिलासा देऊन दंडाची रक्कमही रद्द करून वीज बिल भरणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. 

जिल्ह्यात येत्या काळात भारमान होऊ नये म्हणून ग्राहकांनीही वेळीच वीज बिल भरणे महत्त्वाचे आहे. कणकवली विभागात नळपाणी पुरवठा योजनांमधील मालवणच्या ३५ ग्राहकांचे १ लाख २३ हजार २४३, कणकवलीतील ११४ ग्राहकांचे २६ लाख ७६ हजार १४७, देवगड ५७ ग्राहकांचे १ लाख ८० हजार ४२७, आचरा ६२ ग्राहकांचे २ लाख ९६ हजार ९१९, वैभववाडीतील ८० ग्राहकांचे ७ लाख ४६ हजार ९९३ मिळून ३४८ ग्राहकांचे ४० लाख २३ हजार ७२९ रुपये वीज बिल थकीत आहे. कुडाळ विभागात सावंतवाडीतील ६१ लाख ६५ हजार, दोडामार्गमधील २९ लाख ४२ हजार वेंगुर्लेतील ३८ लाख ७१ हजार, कुडाळमधील ६४ लाख ३८ हजार, ओरोसमधील १६ लाख ९० हजार मिळून कुडाळ विभागातील १ लाख ४७ हजार ६०९ ग्राहकांमधील एकूण थकीत २ कोटी ११ लाख ५० हजार इतकी आहे. 

वीज बिलावर मोबाइल नंबर नोंदवा 
ग्राहकांनी आपल्या वीज बिलाची अपडेट माहिती मिळविण्यासाठी बिलाच्या शेवटच्या पावतीवर मोबाइल क्रमांक नोंदवावा. या मोबाइलवर प्रत्येक ग्राहकाला मीटरच्या रीडिंगची नोंद तसेच बिल भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख एसएमएसद्वारे मोफत दिली जात आहे. वितरणचे मोबाइल ॲपही डाउनलोड करून कॅशलेस व्यवहार आणि अपडेट माहिती प्राप्त करून घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com