सुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान

अमित गवळे
रविवार, 27 मे 2018

पाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी दिली.

पाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी दिली.

मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शनिवारी (ता.२६) परळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे येथे तातडीने शिघ्र कृती दल तैनात करण्यात आले होते. परंतू मतदानाच्या दिवशी रविवारी परळी परिसरात देखील मतदान शांततेत पार पडले. उन्हाळा असल्यामुळे बहुतांश मतदांरांनी सकाळी येवुनच मतदानाचा हक्क बजावणे पसंत केले. त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रात मतदारांची सकाळी गर्दी पहायला मिळाली. दुपारी अनेक मतदानकेंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली. सुधागड तालुक्यात ११ ग्रामपंचायतीत १० ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी एकूण २३ उमेदवार तर ११ ग्रामपंचायत निवडणुकीत ७५ सदस्यांसाठी १६४ असे एकूण १८७ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले होते.

निवडणूकी दरम्यान कुठेही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्रावर पोलीस निरिक्षक दशरथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांच्यासह पालीतील ३० पोलीस कर्मचारी अाणि १३ पोलीस कर्मचारी व ११ होमगार्ड इतरत्र ठिकाणाहूणबंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. निवडणुक यंत्रणेसाठी पोलीस शिपाई यांच्यासह ३०४ मतदान अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती

 

Web Title: eleven gram panchayat elections in peace in sudhagad taluka; 73 percent voting