श्री क्षेञ मार्लेश्वर येथे भाविकांची गर्दी

प्रमोद हर्डीकर
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

डोंगररांगात वसलेल्या मार्लेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. कोसळणार्‍या धारेश्वर धबधब्याचे फेसाळणारे पाणी पाहत, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत श्री मार्लेश्वराचे दर्शन घेवून भाविक गणपतीपुळे, पावसकडे रवाना होत होते. दिवाळी सुट्टीत हल्ली दररोज पर्यटकांची गर्दी मार्लेश्वरला पहायला मिळते.

साडवली- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थांनांपैकी श्री क्षेञ मार्लेश्वर येथे रविवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवाळी सुट्टीत भाविकांनी, पर्यटकांनी मार्लेश्वर दर्शनाला पहिली पसंती दिली. 

डोंगररांगात वसलेल्या मार्लेश्वरच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. कोसळणार्‍या धारेश्वर धबधब्याचे फेसाळणारे पाणी पाहत, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत श्री मार्लेश्वराचे दर्शन घेवून भाविक गणपतीपुळे, पावस कडे रवाना होत होते. दिवाळी सुट्टीत हल्ली दररोज पर्यटकांची गर्दी मार्लेश्वरला पहायला मिळते. 'क' दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मार्लेश्वर घोषित झाले असले तरी सुविधांची वानवा आहे. मारळ ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

ग्रामपंचायतीने आत येणार्‍या पर्यटकांच्या वाहनामागे दहा रुपये कर गोळा करून त्या निधीतून चांगले स्वच्छतागृह, परीसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, धबधब्याजवळ स्नानगृहाची व्यवस्था, पार्कींगची योग्य सोय करता येईल असे पुणे येथील पर्यटक विश्वास गुर्जर यांनी सांगितले. बांधकाम विभागाने या मार्गावर चांगले रस्ते करणे गरजेचे आहे असे मत पर्यटकांनी व्यक्त केले.

 

टॅग्स