संगमेश्वर : सलून बंद ठेवून मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध

sangmeshwar news protest devendra fadanvis
sangmeshwar news protest devendra fadanvis

साडवली: मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी भाषणात नाभिक समाजाबाबत विद्रोही भाषा वापरल्यामुळे संगमेश्वर तालुका नाभिक संघाने चालक-मालक संघटनांनी आपली सलून बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवला. देवरुख येथे नायब तहसिलदार भाऊ गीते यांच्याकडे निषेधाचे निवेदन देण्यात आले.

देवरुख येथे अध्यक्ष पर्शराम चव्हाण,उपाध्यक्ष मिलिंद आंब्रे,अभिजित चव्हाण,सचिव दिनेश आंब्रे,खजिनदार धोंडू आंब्रे,यांच्यासह तालुका कार्यकारिणी सदस्य यांनी हे निवेदन दिले. पञकार परीषद घेउन मुख्यमंञ्यांच्या वक्तव्याचा निषेध करुन समस्त नाभिक समाजाची त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

मुख्यमंञी फडणवीस यांनी नाभिक समाजाचे उदाहरण देवून विरोधकांना बोलणे चांगले नाही. नाभिक समाज हा एकसंघ आहे. तो असले प्रकार कधीच खपवून घेणार नाही, असे सांगत आम्ही आमची सलून एक दिवस बंद ठेवून, जाहीर फलक लावून मुख्यमंञी यांचा निषेध नोंदवत आहोत असे स्पष्ट केले. देवरुख शहरात नाभिक संघटनेने निषेधाचे भले मोठे बॅनर लावून आपला संताप व्यक्त केला आहे. आमचा निषेध शासनापर्यंत पोहचवा असे पर्शराम चव्हाण यांनी नायब तहसीलदार भाऊ गीते यांना निवेदन देताना सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com