उत्पादन शुल्कचे कार्यालय गोदामात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सध्या पुरवठा विभागाच्या गोदामात आहे. उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय व अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाची इमारती बांधण्यासाठी 20 गुंठे जागा प्रस्तावित आहे. तेथे इमारत बांधावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. 
- नीलेश सांगडे, अधीक्षक, रायगड राज्य उत्पादन शुल्क.

अलिबाग - वर्षाला सरकारी तिजोरीत 650 कोटींचा महसूल जमा करून देणाऱ्या रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत सुरू आहे. अलिबाग शहरातील पुरवठा विभागाच्या गोदामातून या विभागाचा कारभार हाकला जात आहे. 

कार्यालयाची इमारत बांधून मिळावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत वारंवार पत्रव्यवहार करूनही त्या विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. हे कार्यालय सुरू असलेल्या गोदामाची इमारतही जीर्ण झाली आहे. तिचीही तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासाठी; तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी अलिबाग शहरात 20 गुंठे जागा देण्याचे प्रस्तावित आहे. या जागेवर कार्यालयाची इमारत व निवासस्थाने उभारावीत यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागासोबत वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्यनिर्मिती कंपन्या; तसेच मद्यविक्रीची दुकाने यांच्याकडून कर वसूल करतो. अवैध दारूधंदे व वाहतुकीविरोधात कारवाईही करण्यात येते. या सर्वातून जिल्ह्यात वर्षाला सुमारे 650 कोटींचा महसूल जमा होतो. 

कोकण

आंबा, काजू बागायतदारांना पीक विम्‍यापोटी १६ कोटी प्राप्‍त रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षीचा आंबा हंगाम बहूतांश बागायतदारांना...

10.48 AM

मुलाखतीमधून निवड - दहा नावे कोकण आयुक्‍तांकडे रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन २५...

10.48 AM

हातात जादुई कला - रेखाकला परीक्षेत उत्तम यश; कलाविश्वाला नवी दिशा देवरूख - मूकबधिर असला तरी परमेश्वराने हाती उत्तम कला...

10.33 AM